कोल्हार : गणेश कुंभकर्ण दाढ येथील सोनार गल्ली मध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याची माहिती दाढ...
कोल्हार : गणेश कुंभकर्ण
दाढ येथील सोनार गल्ली मध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याची माहिती दाढ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली.दाढ येथील सोनार गल्लीत राहणाऱ्या २३ वर्षीय व्यक्ती दोन दिवसापुर्वी राहाता तालुक्यातील चंद्रापुर येथील बाधीत व्यक्तिच्या संपर्कात आल्याने त्यांची व मित्राची लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. सदर दाढ मधील दोन पैकी एका व्यक्तीतीची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला व एकाचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली. ही व्यक्ती राहत असलेल्या सोनार गल्ली,तेली गल्ली,मुस्लिम गल्ली,सुतार गल्ली मधील अति जोखीम ग्रस्त भागातील ३१ व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्यात आले असून. तेली गल्ली,सोनार गल्ली,मुस्लीम गल्ली,सुतार गल्ली हे ठिकाणे कंटेनमेंन्ट झोन व मुख्य बाजार पेठ रोड,विठ्ठल मंदीर ते आश्वी रोड,बोरा ते मराठी शाळा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत अशी माहीती राहाता तहसिलचे नायब तहसिलदार बी.जी भांगरे , तलाठी विश्वनाथ बोदमवाड ,मंडल अधिकारी अनिल मांढरे यांनी दिली.तसेच दाढ गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दिनांक ११/०७/२०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार असुन दरम्यान खबरदारीचे उपाययोजना म्हणून दाढ गावातील कंन्टेन्मेंट झोन मध्ये सोडियम हायड्रॉक्लोराईड ची फवारणी करण्यात आली असुन उर्वरीत दाढ गावातही सोडियम हायड्रॉक्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे अशी माहीती दाढ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.पुनमताई तांबे व ग्रामसेवक एस.पी.गायकवाड यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेद्वारे आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांची नऊ पथके नियुक्त करण्यात आली असून कोरोना पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवली जाणार व तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी सर्दी,ताप,खोकला श्वसनाचा त्रास तथा श्वास घेण्याचा त्रास असल्यास स्वतःहून दाढ प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड यांनी केले आहे.तसेच दाढ मधील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरीकांनी नियमांचे पालन करावे,घरात रहावे, मास्क व सॕनिटाईझरचा वापर करा असे आवाहन सरपंच सौ.पुनमताई तांबे, श्रद्धा ग्राम विकास प्रतिष्ठानचे योगेश तांबे पा. विखे कारखान्याचे संचालक देविचंद तांबे पा.,अशोक गाडेकर,ॲड.भानुदास तांबे पा., माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे पा. यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत