जिल्ह्यात पुन्हा हाहाःकार; 43 जणांना कोरोनाची लागण, श्रीरामपूरचा अधिकारीही बाधित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात पुन्हा हाहाःकार; 43 जणांना कोरोनाची लागण, श्रीरामपूरचा अधिकारीही बाधित

श्रीरामपूर : वेबटीम आज ३० जुन रोजी एकूण 43 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, यात श्रीरामपूर येथील एक वरिष्ठ अधिका...

श्रीरामपूर : वेबटीम
आज ३० जुन रोजी एकूण 43 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, यात श्रीरामपूर येथील एक वरिष्ठ अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने कर्मचाऱ्यांनसह नागरिकांना मोठा 'शॉक' बसला आहे.
     
   अहमदनगर जिल्ह्यात आज सोमवारी संध्याकाळ पर्यंत एकाच दिवसात रेकोर्ड ब्रेक 43 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आज सकाळच्या सत्रात १० दुपारनंतर १९ व १४ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.याशिवाय, पीएमटी लोणी आणि पुण्यातील खाजगी प्रयोगशाळा याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १४ रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे.      सं। गमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या.नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली.
भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष,  ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील३२ वर्षीय व्यक्ती ( कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत