कोल्हारमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हारमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला...

कोल्हार : गणेश कुंभकर्ण कोल्हार येथील बेलापूर रोड लगत असलेल्या लक्ष्मीबाई कुंकूलोळ कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय  व्यक्तीस कोर...


कोल्हार : गणेश कुंभकर्ण
कोल्हार येथील बेलापूर रोड लगत असलेल्या लक्ष्मीबाई कुंकूलोळ कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय  व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याची माहिती कोल्हार भगवतीपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली.  लक्ष्मीबाई कुंकूलोळ संकुलात राहणाऱ्या या 55 वर्षीय व्यक्तीला दोन दिवसापूर्वी ताप व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने ही व्यक्ती स्वतःहून  लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. ह्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. संजय घोलप यांनी दिली ही व्यक्ती राहत असलेल्या लक्ष्मीबाई कुंकूलोळ कॉम्प्लेक्स मधील अति जोखीम ग्रस्त सात व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्यात आले असून लक्ष्मीबाई कुंकूलोळ कॉम्प्लेक्स व स्व. माधवराव  खर्डे पाटील चौक हे दोन ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्यामुळे स्व. माधवराव खर्डे पाटील चौकातील अत्यावश्यक सेवा  वगळता सर्व दुकाना दिनांक १०/०६/२०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांनी दिली.दरम्यान खबरदारीचे उपाययोजना म्हणून  कोल्हार बुद्रुक गावात सोडियम हायड्रॉक्लोराईड ची फवारणी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे व पालक अधिकारी एस.पी.जोंधळे यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेद्वारे आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांची अकरा पथके नियुक्त करण्यात आली असून कोरोना पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली. प्रतिबंधित क्षेत्रात चौदा दिवस डॉ.निलेश पारखे व डॉ. गौरव खर्डे आ
रोग्य सुविधा पुरवणार आहे.

कोल्हार प्रतिनिधी -गणेश कुंभकर्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत