संगमनेर : वेबटीम तालुक्यासाठी रविवार व शनिवार घातवार ठरण्याची ची परंपरा या रविवारीही कायम असून आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या ...
संगमनेर : वेबटीम
तालुक्यासाठी रविवार व शनिवार घातवार ठरण्याची ची परंपरा या रविवारीही कायम असून आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालानुसार संगमनेर तालुक्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 106 वर जाऊन पोहोचली आहे. संगमनेरसह आज जिल्ह्यात एकूण बारा रुग्ण आढळून आले तर दहा रुग्णांना उपचार पूर्ण केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात संगमनेर तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहरातील हुसेननगर या परिसरात पहिल्यांदाच बाधित रुग्ण आढळला आहे. त्यासोबतच यापूर्वी तिघे बाधित सापडलेल्या लखमीपुरा परिसरातून एकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. शहरालगतच्या कुरण गावातूनही दोघांचे अहवाल पॉझिटिव आल्याने कुरण मधील बाधितांची संख्या तीन झाली आहे. आजच्या दिवसातली आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे परिसरात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यासोबतच आज साकुर येथूनही एक रुग्ण समोर आला आहे. एकाच वेळी संगमनेर तालुक्यात सहा रुग्ण आढळल्याने गेल्या काही आठवड्यांच्या शनिवार व रविवार घातवार ठरण्याच्या परंपरेने आपले स्थान कायम ठेवले आहे.
एकीकडे बाधित रुग्ण आढळण्याची श्रृंखला कायम असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उपचार पूर्ण करून घरी परतनाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आजही जिल्हा रुग्णालयातून दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात संगमनेर तालुक्यातील पाच जणांचा, नगर शहरातील दोघे, नगर तालुका, अकोले व पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील 283 जणांनी कोरोनाचा पराभव करून घर घातले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ 113 सक्रीय संक्रमित रुग्ण असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत