'तनपुरे'चा उद्या फैसला ; खासदार विखेंचे कर्डीलेना मदतीसाठी साकडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'तनपुरे'चा उद्या फैसला ; खासदार विखेंचे कर्डीलेना मदतीसाठी साकडे

अहमदनगर : वेबटीम      आज सकाळी नगर दक्षिणेचे खासदार सुजयदादा विखे तसेच तनपुरे सहकारी कारखान्याचे  चेअरमन, व्हा.चेअरमन ,सर्व संचालक व ...

अहमदनगर : वेबटीम

     आज सकाळी नगर दक्षिणेचे खासदार सुजयदादा विखे तसेच तनपुरे सहकारी कारखान्याचे  चेअरमन, व्हा.चेअरमन ,सर्व संचालक व राहुरी तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांनी माजी मंत्री आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, अर्थात ही सदिच्छा भेट नव्हतीच, तर तनपुरे कारखाना कर्ज पुनरगठनबाबत उद्या बँकेची बैठक असल्याने त्यात कर्डीले या यांनी तनपुरे कारखान्याला सहकार्य करावे, यासाठी खा विखे यांनी त्यांना घरी जाऊन दिलेला मोठेपणा होता, असेही बोलले जात आहे.
      दरम्यान, या भेटीत राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या तनपुरे कारखाना चालू करण्याबाबत सहकार्य करावे व उद्या दि. ३० जून रोजी होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटिंग मध्ये कारखान्याच्या कर्ज वसुलीस एक वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्तावा संदर्भात जिल्हा बँकेच्या सर्व संचालक मंडळाशी चर्चा करून कारखाना चालू होण्यासाठी योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच शेतकरी,कामगारांच्या व राहुरी तालुक्याच्या हितासाठी कारखाना पूर्ववत चालू करावा अशी विनंती कारखान्याच्या संचालक मंडळाने माजीमंत्री आ. कर्डिले यांचेकडे केली. दरम्यान, उद्या कर्डीले विखेंच्या सांगण्यावरून' तनपुरे'  मदत करणार का ? याकडे लक्ष आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत