राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी विखे-कर्डीले प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, मात्र गावच्या पारावर सुरू असलेली कुजबूज ...
राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी विखे-कर्डीले प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, मात्र गावच्या पारावर सुरू असलेली कुजबूज कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर नवलच वाटलं, म्हणे कारखाना सुरू करण्याची नव्हे ही तर बंद झाल्यानंतरची एकमेकांवर खापर फोडण्याची तयारी आहे, आता काय खरं आणि काय खोटं देव जाणो, पण जे दबक्या आवाजात ऐकलं ते असं.....!
डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या कर्जामुळे अडचणीत आहे, त्यामुळे हा कारखाना सुरू होईल की नाही अशी चिंता सभासद कामगारांना असताना दुसरीकडे हा कारखाना बंद ठेवावा लागलाच तर तो कुणामुळे बंद पडला याचे खापर फोडण्यासाठी आतापासूनच विखे आणि कर्डीले यांचे डावपेच सुरू आहेत, खरंतर, आता पुढे कारखान्याचे काय होणार हे दोघांनाही माहिती आहे, त्यामुळे हे बालट दुसऱ्यावर लोटून देऊन मोकळे व्ह्यायचे हाच तो प्रयत्न असल्याचे बोलले जाऊ लागले आहे
लोकसभा, त्यानंतर विधान सभा निवडणुकीत विखे आणि कर्डीले यांचे संबंध तालुक्याने नव्हे तर राज्याने पाहिले आहे, लोकसभा जिंकल्यावर विखेंनी कर्डीलेवर केलेलं शरसंधान आणि विधानत्सभा हरल्यावर कर्डीले साहेब तर थेट शिष्टमंडळ घेऊन माजी मुख्यमंत्र्याकडे अर्थात फडणवीस यांच्याकडे कशासाठी, कुणावर कारवाईसाठी गेले होते, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, त्यामुळे कुणी काहीही म्हणो, विखे -कर्डीले वाद लवकर विझनारा नक्कीच नाही, उलट तनपुरे कारखान्यातून ही आग एक भडका घेण्याच्या तयारीत आहे, आता जिल्हा बँक थकीत कर्जासाठी तगादा लावून बसली आहे, त्यातून डोक्यावर कारवाई येऊन ठेपली आहे, असे असताना बँकेची मदत शक्य नाही, म्हणून डॉ सुजय दादांनी पहिली खेळी करत संचालक मंडळ कर्डीलेकडे पाठवून जनतेचे कॅमेरे तिकडे वळवले, आता सर्व काही कर्डीले साहेबांच्या हातात आहे, असेच चित्र यातून रंगवले जात आहे, मात्र कर्डीले यात तरबेज आहेत, त्यांनी विखेंचा हा डाव ओळखला आहे, त्यामुळेच कारखाना सुरू करण्यासाठी आपण प्रामाणिक मदत केली, यापुढेही करू अशी आश्वासन देऊन विखेंनी पाठवलेले दूत पुन्हा मार्गस्थ केले, मात्र आपण कारखान्याला मदत केली, मात्र विखेनी बँकेला दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे ही वेळ आल्याचे सांगून कारखाना बंद झाल्यास माझ्यावर खापर फोडू नका, असा इशारा त्यांनी देऊन टाकला, कर्डीले साहेबांच्या या भूमिकेतून आता त्यांनी जनतेसमोर आपण मदत करणार असल्याचे सांगतानाच विखेनी शब्द पाळला नाही (बँकेला दिलेला) हे सांगून पुन्हा कारखान्याचं बर-वाईट (अर्थात फकत वाईट) पुन्हा विखेंकंडे टोलवून दिले. त्यावर सुजय दादांनी काल मोठी गुगली टाकली, त्यांनी चक्क पत्रक काढून कर्डीले साहेबांवर स्तुतीसुमने उधळली, ती देखील इतकी उधळली की जनताही संभ्रमात पडली, की लोकसभेनंतर आपल्या भाषणातून चिरफाड करणारे हेच डॉक्टर आज पुन्हा त्या जखमाना आपल्या या पत्रकातून टाके घालण्याचे काम तर करत नाही ना, असे वाटू लागले, मात्र सरळ असेल ते राजकारण कसले, असो खा सुजय दादां यांनी, कर्डीले साहेबांमुळे कारखाना सुरू होऊ शकला अशी कबुली देतानाच बंद असलेला, अवसायनात निघू शकणार हा कारखाना वाचविण्यासाठी कर्डीले साहेबांचे जीवतोड प्रयत्न सुरू असल्याचे सांगून पुन्हा एकदा या यश अपयशात त्यांना भागीदार करून घेतले आहे, त्यावर कळस म्हणजे जिल्हा सहकारी बँकेच्या कारवाईला विखे- कर्डिले वादाचे स्वरूप देऊ नये, अशी जनतेला आठवण करून देतानाच कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डीले दोघेही कटिबद्ध आहेत. असे म्हणून त्यांनी चेंडू पुन्हा कर्डीलेच्या दरबारात टोलवून टाकला, शिवाय कदाचित कर्डीले यांना थोडं खुश करण्यासाठी म्हणा किंवा खरंंचं म्हणा, पण राज्यमंत्री तनपुरे यांच्यावर टीका करावी लागणारच, म्हणून एकेकाळी कारखान्याची गणना अतिशय संपन्न अशा संस्थांमध्ये होत होती. आजची दुरावस्था, थकीत कर्ज फेडण्यासाठी मालमत्तांची विक्री, इतर पूरक प्रकल्प बंद पडणे कोणाच्या काळात झाले याचा विसर सभासदांना पडलेला नाही. तत्कालीन सत्ताधार्यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे करून नंतर स्वतःच्या मालकीचा कारखाना काढला, मात्र त्यांना कोणी जाब विचारायला तयार नाही,अशी टीका केली, मात्र जिल्हा सहकारी बँकेची कारवाई ही नियमाप्रमाणे आहे. आरबआयच्या नियमांना अधीन राहून शेतकर्यांच्या हितासाठी जिल्हा बँक सकारात्मक निर्णय घेईल, अशी मला खात्री आहे व संचालक मंडळाने बँकेकडे मुदतीसाठी अर्ज सुद्धा केला असल्याची माहिती दिली...! आशा शब्दात आता सर्व काही बँकेवर अवलंबून असल्याचे जनतेसमोर सांगितले आहे, दरम्यान, आता जिल्हा बँक काय तो निर्णय घेणार आहे , आणि जिल्हा बँकेत कर्डीले साहेब सांगतील, तेच होतं हे त्यांना व जनतेलाही माहिती आहे, त्यामुळे परवानगी मिळाली तर उत्तमचं अन नाहीच जमलं तर कर्डीले साहेब आहेतच...!आता, विरोधी गोटातून ही सर्व सुरू असलेली चर्चा एकूण मी तर गोंधळून गेलो, पण खरं काय ते समोर येणार आहेत, कारखाना सुरू झाला तर त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते समजू आणि बंद ठेवला तर ही कुजबुज खरी मानायला हरकत नाही,
राजकारण काहीही असो, मात्र खासदार सुजय दादा विखे व माजी आमदार कर्डीले साहेब यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत, या दोघांनी ठरवलं तरच कारखाना सुरू होणार आहे, अन्यथा ही कामधेनू खरेदी करण्यासाठी अनेक जण टपून आहेतच, त्यामुळे सुजय दादांनी आज तनपुरे कारखान्याला विखे- कर्डीले वादाची झालर लावू नका, अशी विनंती केली आहे, मात्र, दादा, जो पर्यंत तुम्ही दोघे हा कारखाना या गाळपाला चालू करून दाखवत नाही, तो पर्यंत हे जनता बोलणारच, आणि कदाचित कारखाना बंद राहिला, किंवा जप्तीची , लिलावाची कारवाई झाली, तरी हे खापर तुम्ही कुणावरही फोडा मात्र जनता तुम्हा दोघांनाचं जबाबदार धरले, हे नक्की
कोणत्याही टिप्पण्या नाहीत