राहुरी : वेबटीम, लोकसभेच्या आयत्या तयार झालेल्या प्लॅटफॉर्मवर राहुरीच्या विधानसभा निवडणुकीत विजय दृष्टीपथात वाटत असल्याने या ठि...
राहुरी : वेबटीम,
- लोकसभेच्या आयत्या तयार झालेल्या प्लॅटफॉर्मवर राहुरीच्या विधानसभा निवडणुकीत विजय दृष्टीपथात वाटत असल्याने या ठिकाणी विखे घराण्यातील जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्यासाठी उमेदवारी आणण्याची अनेकांची इच्छा होती, त्यात डॉ राजेंद्र विखे पाटील हे देखील एक होते, त्यांनीच सर्वप्रथम तशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र मुंबईत राजकीय गणिते न जुळल्यानेच या घडामोडी शेवटपर्यंत कागदावर राहिल्या, अन्यथा राहुरीची आमदारकी विखेंकडेच होती, असा गौप्यस्फोट विखे समर्थक एका बड्या नेत्याने खासगीत केला आहे. राहुरीच्या राजकारणात कारखाना ताब्यात घेऊन हळूच शिरकाव केल्यानंतर विखेनी येथे आपली पक्कड आणखी मजबूत केली. पुढचे राजकारण डोक्यात ठेऊन संचालक पदाचे तिकिटे, नगरपालिका, पंचायत समित्या, बाजार समित्याच्या उमेदवाऱ्या वाटल्या, त्यातून विखे गट व्यापक स्वरूपात तयार झाला, पुढे अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणूक लागली, उमेदवारी मिळेपर्यंत सुजय विखे यांनी संपूर्ण राहुरी पिंजून काढली, अनेक ठिकाणी सेटलमेंट करून ठेवली, राहुरीत कुणाला काय द्यायचं आणि काम करून घ्यायचं, ही कला जणू काही प्रवरेच्या शाळेत शिकायला मिळते, असो, हे सर्व प्रयोग विखेनी केले होते, त्याचे फळही त्यांना मिळाले, राहुरीने प्रचंड मताधिक्य देऊन डॉ सुजय विखे पाटील यांना खासदार केले. राहुरीने मताधिक्य देऊन केलेले हे अतूट प्रेम पाहून संपूर्ण विखे कुटुंबही भारावून गेले होते, आणि हीच आकडेवारी पाहिल्यानंतर पुढे राहुरीतून विधानसभा लढविण्याची संकल्पना समोर आली. लोकसभेनंतर आमदार कर्डीले यांच्यावर स्वतः विखे पाटील व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. याशिवाय राहुरीतून पुन्हा कर्डीले की सत्यजित कदम अशीही चर्चा सुरू होती. या दोन्ही गटातून उमेदवारीसाठी एकमेकांना विरोध सुरू असतानाच कोल्हार येथे एक बैठक झाली, या बैठकीत डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्यासमोर लोकसभेचा आढावा घेण्यात आला, यावेळी राहुरीत फुल सपोर्ट मिळाला आहे, लोकसभेचा निमित्ताने राहुरी तालुक्यातील जनतेशी आपला संपर्क झालेला आहे, मतदार संघाची खडानखडा माहिती आपल्याकडे आहे, आपल्याकडे गटांगटात कार्यकर्त्यांची फौज आहे, जनतेचाही कारखाना सुरू केल्याने विश्वास आहे, लोकसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहेच, इत्यादी बाबींवर यावेळी उहापोह होऊन राहुरी आपणच लढवली तर...., अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली,, हे सर्व गणित पाहून डॉ राजेंद्र विखे पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना जर पक्षाने सांगितले व नामदार साहेबांनी ठरवलं तर या ठिकाणी शालिनीताई विखे पाटील यांची उमेदवारी देण्यात हरकत नाही, हा आपल्यासाठी सेफ मतदार संघ असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते, त्यासाठी तसा प्रयत्न करू असेही यावेळी ठरले होते. कार्यकर्त्यांचा हाच सूर राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय विखे पाटील यांच्यापर्यंत पोहचला होताच, मात्र त्यांनी तशी इच्छा 'उघडपणे' कधीही व्यक्त केली नव्हती, अर्थात त्यांनतर याविषयी अनेक बैठका झाल्या, मात्र मुंबईतील 5 दिवस चाललेल्या वेट अँड वॉच नंतर राहुरीतील तिढा सुटला, भाजपकडून आमदार कर्डीले फायनल झाले आणि विखे गटाचा भ्रमनिरास होऊन या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला. दरम्यान, प्रयत्न करूनही उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराज न होता विखे गटाने लोकसभेतील परतफेड म्हणून कर्डीलेंचे केलेले 'काम' लपून राहिलेले नाही, हे तितकेच खरे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत