आज सोमवार दि 29 ; वाचा काय म्हणतेय तुमची रास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज सोमवार दि 29 ; वाचा काय म्हणतेय तुमची रास

तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल?  जाणून घ्या... - पं. डॉ. संदीप अव...

तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल?  जाणून घ्या...

- पं. डॉ. संदीप अवचट

मेष : गुप्तहेर वृत्तीने काम कराल. योग्य माहितीसाठी थांबा. एकदम आरोप नकोत. आजचा दिवस शुभ. मुलांबद्दलची चिंता दूर होईल. दिवसाचा उत्तरार्थ मौजमजेत जाईल. सकारात्मक ऊर्जेमुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृषभ : मानसिक संयम राखा. अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. चालू कामे थांबवावी लागतील. मित्रमंडळी मदत करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा महत्त्वाचा घ्याल. अनावश्यक खर्च आणि वादविवाद टाळा.
मिथुन : जिभेवर ताबा ठेवा. मित्रांकडून लुटले जाल. भ्रामक कल्पनेवर जगू नका. अनोळखी व्यक्तीवर बिलकूल विश्वास ठेऊ नका. कौटुंबिक वातावरण बिघडण्याची शक्यता. आत्मविश्वास कायम ठेवा.

कर्क : आज सात्विक आहार घ्या. संत अथवा माहात्म्यांचा दृष्टिकोन समजावून घ्याल. जीवनाचे मर्म जाणाल. जितकी मेहनत घ्याल, तितका लाभ मिळेल. कार्यालयातील वातावरण उत्तम राहील. दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वादात पडू नका. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
सिंह : रोखठोक भूमिका नुकसान करेल. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. घुसमट होऊ देऊ नका. शुभवार्ता मिळतील. एखाद्या जुन्या वादाशी संबंधित एखादे तत्त्व त्रासदायक ठरू शकते. नामस्मरण हितकारक ठरेल. हितशत्रू पराभूत होतील.
कन्या : विनाकारण वाद वाढवून त्रास विकत घेऊ नका. ज्येष्ठांशी सल्लामसलत करा. वेळच्यावेळी निर्णय घ्या. मित्रमंडळींची मदत होईल. मान, सन्मान वाढेल. हितशत्रू निष्प्रभ होतील. जोडीदाराचा पाठिंबा मनोबल वाढवेल. नोकरदार वर्गासाठी उत्तम दिवस.
तुळ : काच सामानाचे नुकसान होण्याची शक्यता. विरोध झुगारून काम करा. जमिनीचा व्यवहार करण्यास दिवस चांगला. अनावश्यक खर्च किंवा विनाकारण केलेली चिंता त्रस्त करू शकते. वादविवाद टाळल्यास दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील. मानसिक शांतता लाभेल.
वृश्चिक : अचानक आलेल्या संधीचे सोने करा. काही जुगारी निर्णय घ्यावे लागतील. यशाचे मानकरी व्हाल. स्वप्ने पूर्ण होण्याचा दिवस. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे योग आहेत.
धनु : आर्थिक गणित जमेल. शेअर्समधील वाढ समाधान देईल. परमार्थ करा. आजचा दिवस मंगलमय असेल. मन प्रसन्न राहील. शुभवार्ता मिळतील. भविष्यातील योजनांवर विचार कराल. मान, सन्मान मिळतील. अधिकारी वर्ग आपल्या बाजूने असेल.
मकर : अति प्रमाणात केलेली चेष्टा अंगाशी येईल. वेळेचे गणित साधा. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मेहनतीनुसार यश मिळेल. हितशत्रू निष्प्रभ होतील. मित्रमंडळी आनंदवार्ता देतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कुंभ : तर्काने केलेले काम नुकसान दर्शवते. आगाऊपणाने केलेली कृती समस्या वाढवेल. भांडणांपासून दूर राहा. कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना काळजी घ्या. नकारात्मक विचारांची जागा सकारात्मकता घेईल. नामस्मरण करणे हिताचे ठरेल.
मीन : वाहनाचा वेग मर्यादेत ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता. सतर्क राहणे महत्त्वाचे राहील. सावध राहून व्यवहार करावेत. धनलाभाचे योग आहेत. अनावश्यक खर्च टाळावेत. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता. भागीदारीतून समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत