इंदोरीकर महाराजांवर अखेर गुन्हा दाखल ; वाचा काय बोलले होते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

इंदोरीकर महाराजांवर अखेर गुन्हा दाखल ; वाचा काय बोलले होते

अहमदनगर : वेबटीम निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर  महाराज यांनी उरण, नगर व बीड अशा तीन ठिकाणी आपल्या किर्तनात स्त्रीसंग सम तिथीला ...

अहमदनगर : वेबटीम
निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर  महाराज यांनी उरण, नगर व बीड अशा तीन ठिकाणी आपल्या किर्तनात स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते आणि अशुभ तिथिला झाला तर संतती रंगडी व बेगडी जन्माला येते. या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या समर्थकांनी अक्षेप घेतला होता.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. संबंधित विषयान्वये 17 फेब्रुवारीला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी तुर्तास चौकशी केली. मात्र, कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, या समितीने त्यांना पुन्हा 27 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना नोटीस काढली होती. तुम्ही जर निवृत्ती महाराजांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करुन तुम्हाला सहआरोपी करु. त्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी तक्रारदार यांच्याकडे काही पुरावे मागितले होते. ते सक्षम पुरावे देखील पुरविण्यात आले होते. त्यानंतर त्याची संखोल चौकशी करण्यात आली.     यात खरोखर पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असून ते सामाजिक आणि नैतीक दृष्ट्या चूक आहे. या भुमिकेवर समिती ठाम राहिल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशान्वये संगमनेर तालुका वैद्यकीय अधिक्षक यांनी कोर्टात ही फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत