तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? घ्या... - पं. डॉ. संदीप अवचट मे...
तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? घ्या...
- पं. डॉ. संदीप अवचटमेष : भाग्योदय होईल. चहुकडून लाभ होतील. ऐनवेळी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. खरेदीवर भर राहील. मान, सन्मान मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध मनोरंजन, मौजमजेत जाईल. जुन्या-नव्या मित्रांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.
वृषभ : शांत चित्ताने कामे कराल. कलहाचे वातावरण होऊ देऊ नका. वाद वा भांडणांपासून दूर राहा. गरजेच्या वस्तू खरेदी कराल. आरोग्य उत्तम राहील. हितशत्रू निष्प्रभ ठरतील. इच्छा पूर्ण होण्याचा योग. दिनक्रम व्यस्त राहील. आपल्या निर्णय क्षमतेचा फायदा होईल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल.
मिथुन : शब्दाने शब्द वाढवू नका. घुसमट टाळा. भावनिक विचार वा ताण नको. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. बौद्धिक चर्चांमध्ये अवश्य भाग घ्यावा. चांगल्या कामासाठी केलेला खर्च भविष्यात लाभदायक ठरेल. आध्यात्मिक आवड वाढेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. आवड जोपासाल.
कर्क : गोड बोलून कामे करून घ्या. जोडीदाराच्या मनातले ओळखू शकाल. गनिमी कावा चालेल. मानसिक तणावाचा दिवस. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्च टाळावेत. कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवतील. मन खिन्न होईल. संयमाने कामे करा. कोणाकडूनही कर्जाऊ रक्कम घेऊ नका. सामाजिक व्यवधान सांभाळा.
सिंह : मानसिक इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. अनेक कामे हातावेगळी कराल. यशाचे चौकार माराल. मानसिक शांतता लाभेल. भाग्य पूर्ण साथ देईल. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. उत्साह वाढेल. परिश्रमांचे योग्य फळ मिळेल. मुलांविषयी विश्वास वाढेल. मौजमजेवर पैसे खर्च कराल. हितशत्रू पराभूत होतील.
कन्या : नोकरीत अन्याय होणे शक्य. वरिष्ठांची नाराजी त्रस्त करेल. गोंधळ वाढविणारा दिवस. कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नकारात्मक विचार टाळावेत. मन विचलित होण्याची शक्यता. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम. बोलण्यात गोडवा ठेवावा. डोळ्याचे आजार उद्भवू शकतात.
तुळ : हेतूपूरक कामे पूर्ण होतील. मोठ्या योजनांची आखणी कराल. वेळेचा अपव्यय टाळा. आजचा दिवस अनुकूल. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. मानसिक शांतता लाभेल. ऊर्जा आणि उत्साहवर्धक दिवस. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पालकांचा आशीर्वाद यशाचा मार्ग प्रशस्त करेल. अनावश्यक खर्च होतील.
वृश्चिक : उत्तराला प्रत्युत्तर द्याल. धावपळीचा दिवस. हमाली कामे करणे टाळावे. व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे हितकारक ठरेल. कोणालाही कर्जाऊ रक्कम देऊ नका. निर्णय क्षमतेचा अभाव त्रस्त करेल. संयम आणि धैर्य कायम ठेवल्यास दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल. हितशत्रूंचा पराभव होईल.
धनु : माणसामाणसातील फरक ओळखा. शिक्षक वा प्राध्यापकांना दिवस दगदगीचा. वास्तविकतेवर कामे होतील. नोकरदार वर्गाला लाभ मिळतील. आजचा दिवस शुभ आणि फायदा मिळवून देणारा ठरेल. अधिकार, संपत्तीत वाढ होईल. नवी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. जुना वाद संपुष्टात येण्याची शक्यता. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.
मकर : कामांची रूपरेषा ठरवा. सहकार्याने कामे होतील. स्वावलंबन असणे आवश्यक. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म करण्याचा विचार कराल. कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकारी खूश होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. धार्मिक कार्यातील रुची वाढेल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कुंभ : लोकनिंदेला सामोरे जावे लागेल. व्यसनाधीन होऊ नका. यशाचा शॉर्टकट वापरू नका. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग घ्याल. भाग्य पूर्ण साथ देईल. सासरच्यांकडून सन्मान प्राप्त होईल. आज केलेली गुंतवणूक भविष्यात लाभकारक ठरेल. व्यवसायावर भर द्याल. प्रलंबित कामे पूर्णत्वास न्याल.
मीन : गुप्त शत्रूंवर मात कराल. वाढीव कामे व जबाबदारी टाळून चालणार नाही. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. प्रतिकूल परिस्थिती उद्भवण्याची शक्यता. संयमाने कामे करा. अनावश्यक खर्च होतील. आप्तेष्टांकडून फसवणूक शक्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत