आज बुधवार दि 1 जुलै ; वाचा आजचे राशीभविष्य - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज बुधवार दि 1 जुलै ; वाचा आजचे राशीभविष्य

मेष : पत्नीला कामात सहकार्य करा. छानछौकी टाळा. स्वभावातील तिरकसपणा टाळावा. कामात अडचणी येतील. मेहनत जास्त आणि लाभ कमी, असा आजचा दिवस. वा...

मेष : पत्नीला कामात सहकार्य करा. छानछौकी टाळा. स्वभावातील तिरकसपणा टाळावा. कामात अडचणी येतील. मेहनत जास्त आणि लाभ कमी, असा आजचा दिवस. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याची तयारी ठेवा. वरिष्ठांची नाराजी त्रस्त करेल. रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवन उत्तम राहील.
वृषभ : अभ्यासोनी प्रकटावे हे ध्यानात ठेवावे. आपल्या मतांचा सुगावा लागू देऊ नका. सर्दीजन्य आजार होण्याची शक्यता. जोडीदाराची साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस. दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक ठरेल. नवीन योजनांवर विचार करावा. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, ही खूणगाठ मनाशी बांधलीत तर फायदा होईल.
मिथुन : मनातील भावना प्रिय व्यक्तीसमोर मोकळेपणाने मांडा. कामे यश देतील. प्रतिनिधी म्हणून चमकाल. अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागेल. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील. नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारेल. यशाचे मार्ग प्रशस्त होऊन धनलाभाचे योग आहेत. नोकरदार वर्गाच्या काही समस्यांचे निराकरण होईल. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल.
कर्क : संघटनात्मक कामे खोळंबतील. धरसोड वृत्ती नको. नेमके नियोजन तारून नेईल. बुद्धी आणि विवेकाने केलेली कामे यश देतील. समस्यांचे निराकरण होईल. आत्ममग्न राहाल. मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल. टीकेकडे दुर्लक्ष करा. आपल्या कामावर भर द्या. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.
सिंह : अविश्वास दाखवू नका. साहसे त्रास देतील. प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. कोणतेही काम, व्यवहार करताना सावध राहा. बोलण्यावर ताबा ठेवा. वादात पडू नका. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंतांमुळे मन विचलित होईल. कठोर मेहनतीनंतरच यश मिळेल. सामाजिक उत्तरदायित्व वाढेल. अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार टाळा.
कन्या : आपसूक प्रेमात पडाल. मानसिक आनंद वाढेल. आवडत्या कामात वेळ घालवाल. कामे सुलभतेने पार पडतील. यशाचे मार्ग प्रशस्त होतील. ग्रहमान अनुकूल असल्याने लाभ मिळतील. सरकारी काने विनाअडथळा पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रचनात्मक कार्ये कराल. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक धनलाभाचे योग आहेत.

तुळ : एकटेपणा जाणवेल. देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत राहील. आजचा दिवस शुभ. कार्यक्षेत्रात धनलाभाचे योग. परिश्रमानंतरच मनोवांच्छित फळ मिळेल. प्रलंबित येणी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक आणि आध्यात्मिक रुची वाढेल. दैनंदिन कामात चालढकल करू नका.
वृश्चिक : तरुण मंडळींनी भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळावे. कामांतील अडचणी कमी होतील. वास्तुविषयक व्यवहार शक्य. जोखीम पत्करलीत, तर यश मिळेल. मुलांसंदर्भातील समस्यांचे निराकरण होईल. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील. मोसमी आजार त्रस्त करण्याची शक्यता.
धनु : दुसऱ्यांची उणीदुणी काढणे नको. नव्या बदलाच्या बातम्या येतील. मन विचलित राहील. अंतर्गत विरोध होईल. समस्या त्रस्त करतील. कोणताही व्यवहार करताना सावध राहा. कामे विचारपूर्व करा. अनावश्यक खर्च टाळा. करोना संकटामुळे प्रवास लांबणीवर टाकाल.
मकर : कायदा हातात घेऊ नका. संशोधनात मन रमेल. योग्य संधीचा लाभ घ्यावा. कार्यक्षेत्रात लाभदायक दिवस. विद्यार्थी, व्यापाऱ्यांनाही काही ना काही लाभ होतील. मात्र, दिवसाचा उत्तरार्ध मन विचलित करणारा ठरू शकतो. वाहन, जागा खरेदीचा विचार सुखावेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल.
कुंभ : घडी विस्कटेल असे वर्तन टाळा. अपप्रचार नको. सतत होणारे बदल नकोसे होतील. दिनक्रम व्यस्त राहील. आळस झटकून कामाला लागा. प्राधान्यक्रम ठरवून कामे करा. वरिष्ठांची नाराजी त्रस्त करेल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. हितशत्रू निष्प्रभ ठरतील. दिवसाचा उत्तरार्ध खर्चिक ठरण्याचे संकेत आहेत.
मीन : दूषित मनोवृत्तीच्या लोकांपासून दूर राहा. स्वमतावर ठाम राहा. जबाबदारी घ्या. आजचा दिवस काहीतरी विशेष करून दाखवण्यात व्यतीत होईल. भाग्यावर जितका विश्वास आहे, तितकाच स्वतःवरही ठेवा. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम दिवस. अधिकारी वर्गाशी चांगला ताळमेळ राहील. नकारात्मक विचार टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात मुलांकडून अचानक शुभवार्ता मिळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत