अहमदनगर : वेबटीम। नेहमीच आपले साधे राहणीमान आणि मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे मंत्री झाले मात...
अहमदनगर : वेबटीम।
नेहमीच आपले साधे राहणीमान आणि मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे मंत्री झाले मात्र तरीही त्यांच्या स्वभावात पहिलाच साधेपणा आणि नम्रता तशीच आहे, आता आजच पहा ना तिसगांवला जात असताना रस्त्यात लहान मुलांनी दादांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरला आणि मग काय राजकारणात फ्रंटफ्रुटवर खेळणारे दादा क्रिकेटच्या मैदानावरही फटके मारताना पहायला मिळाले, दादांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटल्यानंतर मुलांनी त्यांच्यासमवेत सेल्फी घेत राज्यमंत्र्यासंमवेतचा हा क्षण मोबाईलमध्ये कैद केला.याचे झाले असे की, आज राज्यमंत्री प्राजक्त दादा पाथर्डीकडे जात असताना रस्त्यावर त्यांना काही मुलांनी रोखले व आपल्यासंमवेत क्रिकेट खेळण्याचा हट्ट धरला, क्षणात दादांनी मुलाचा आग्रह पाहून गाडीतून उतरून थेट शेतातील ते मैदान गाठले.दादांनी बॅट हातात घेतली तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांना गोलंदाजी करण्याच्या मुलांनी हट्ट धरला, मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत भिटेनी दादा, मी रिटायर्ड झालोय, आता फकत फिल्डिंग करतो असे सांगून विकेट किप्परची जागा पकडली, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते धीरज पानसंबळ हे स्लिपला तैनात झाले, एका मुलाने वेगात गोलंदाजी केली आणि दादांनी फ्रंटफुटवर जाऊन फटकेबाजी करत मूलासमवेत काही वेळ घालवला,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत