विखेंचा इंटरेस्ट संपला, तर कर्डीलेही पुन्हा चूक करणार नाही ; मग ही नौटंकी कशासाठी ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विखेंचा इंटरेस्ट संपला, तर कर्डीलेही पुन्हा चूक करणार नाही ; मग ही नौटंकी कशासाठी ?

राहुरी : वेबटीम        राहुरी तालुक्याच्या राजकारणात नेहमीच तनपुरे सहकारी साखर कारखाना हा निर्णायक भूमिका बजावत असतो, हे माहिती असताना...

राहुरी : वेबटीम       
राहुरी तालुक्याच्या राजकारणात नेहमीच तनपुरे सहकारी साखर कारखाना हा निर्णायक भूमिका बजावत असतो, हे माहिती असतानाही आमदार शिवाजी कर्डीले यांनी विखेंच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना जिल्हा बँकेची मदत मिळवून दिली आणि याच मोठ्या चुकीने  स्वतःची आमदारकी गमावून बसले, अशी भावना त्यांचेच कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत. आता कर्डीलेनाही आपलं काय चुकलं हे समजले असेलच, त्यामुळे खरंच ते तिचं चूक पुन्हा करतील का आणि विखेंचे मिशन लोकसभा देखील पूर्ण झालेले असल्याने ते देखील पदरमोड करून कारखाना सुरू करण्यासाठी खरंच उत्सुक आहेत का ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे राहुरीतील जनता शोधण्याचा प्रयत्न करत आहे.                          
       
 राहुरीचे राजकारण हे नेहमीच साखर कारखान्याभोवती फिरताना दिसते, कारण कारखान्याच्या माध्यमातून गटागटात मजबूत तटबंदी उभारलेली असते, त्यात संचालक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज असते, त्यामुळे ज्याच्या ताब्यात कारखाना त्याच्याकडे आमदारकी हे ठरलेलंच गणित असते, 2014 च्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डीले यांना प्रवरेची मोठी मदत मिळाली होती, तीच मदत 2019 ला ही मिळेल या हेतूने आमदार कर्डीले यांनी राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी विखेंना काहीसे आढेओढे घेऊन अर्थात पुढचा शब्द घेऊन मदत केली. खरतर बंद पडलेला राहुरी कारखाना सुरू करतानाचं विखे आणि कर्डीले यांना शेतकऱ्याचा फार पुळका होता असेही नाही, या दोन्ही नेत्याचा यामागे स्वार्थ होताच, विखेना नगर दक्षिणेसाठी कुठंतरी स्टँड हवं होतं, ते त्यांना राहुरीत सापडले, कारखाना निवडणूक ही संधी त्यांनी शोधली, त्याचबरोबर बाजार समिती, पंचायत समिती, नगरपालिका लढवून त्यांनी कार्यकर्ते गोळा केले, पुढे कारखाना सुरू करण्यासाठी आमदार कर्डीलेंची शिताफीने मदत घेतली, कर्डीले यांनाही तसं राहुरीचे आणि कारखान्याचे काहीही घेणेदेणे नव्हतेच, त्यांना फकत आमदारकी टिकवायची होती, त्यामुळेच त्यांनी कारखान्याबरोबरच अन्य निवडणुकातून माघार घेत विखेना मदत करण्याचा निर्णय घेतला, आपल्या आमदारकीसाठी त्यांना विखे हाच मदतीचा उत्तम पर्याय वाटत होता, त्यामुळेच त्यांनी डोळे झाकून विखेना मदत केली, कारखाना सुरू केला, पेट्रोल पम्प सुरू केला, मात्र ते विखेना गृहीत धरून बसले होते, परंतु दुसरीकडे त्यांच्याच गटातील नेते अर्थात पहिले विकास मंडळ नकळत कर्डीले यांना सोडून विखेकडे गेले होते. तसेच कारखाना, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकीतून ऐनवेळी कर्डीलेनी माघार घेतल्याने अनेक इच्छुक नाराज होते, त्यांना विखेनी अलगद गळाला लावले होते, असो हे झाले लोकसभेपुर्वीचे गणित,
 आता कारखाना सुरू झाला होता, विखेंचा बोलबाला झाला, त्यांची ताकद वाढली, लोकसभेला हीच ताकद त्यांना कामी आली, राहुरीच्या लीडवर त्यांनी कर्डीले यांचे जावई संग्राम जगताप यांचा पराभव केला,आरोप प्रत्यारोप झाले,  त्यातून कर्डीले-विखे संबंध दुरावले, पुढे विधानसभा लागली, आमदार कर्डीलेंचे सर्वच गणित चुकले, राहुरीतून दगाफटका झाला आणि कर्डीलेंची आमदारकी गेली, त्यानंतर विखेंवरही आरोप झाले, त्यातून कर्डीले समर्थकांनी कारखाना सुरू करण्यासाठी विखेना मदत केली, तीच कर्डीले साहेबांची सर्वात मोठी चूक ठरली , त्यामुळेच विखे राहुरीत घुसू शकले आणि तेथूनच कर्डीले गटाला खिंडार पडल्याची भावना व्यक्त होऊ लागली, असो, आता लोकसभा केव्हाच झाली, विखेना हवं ते मिळाले, त्यामुळे 10-12 कोटी रुपये भरून आता कारखाना सुरू करावा, अशी काही त्यांची फारसी इच्छा नसावी, तसेच पुन्हा एकदा मदतीसाठी कर्डीलेना हात जोडण्याची त्यांना आता गरजही नाही, तर विधानसभाही होऊन गेली, त्यात याच कारखान्याला ( विखेना) मदत केली आणि आमदारकी गमावून बसलो, याचे शल्य अजूनही कर्डीले यांनाही बोचत असणारच, त्यामुळे पुन्हा विखेना मदत करून त्यांना राहुरीत आणखी पकड निर्माण करण्याची ते संधी देतील, असे अजिबात वाटत नाही. ,त्यात वर्षभरात  कारखाण्याची निवडणूक लागणार आहे, त्यामुळे जे काही घडेल ते फकत आता एकमेकावर खापर फोडून होईल व कारखाना मात्र यंदा बंद राहील,  असेच हे चित्र दिसत आहे, त्यामुळे आज विखे आणि कर्डीले हे दोन्ही नेते कारखाना सुरू करण्यासाठी दाखवत असलेली तळमळ बेगडी असल्याचेच दिसत आहे, यातून खरचं शेतकऱ्यांची काळजी असेल तर विखेंनी पदरमोड करून कारखाना सुरू करावाच आणि कर्डीले यांनीही राजकारण विरहित मदतीची भूमिका घ्यावी, अशी राहुरीकरांची इच्छा आहे. यंदा कारखाना सुरू करून दाखवला तरच जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, अन्यथा, राहुरीतील शेतकऱ्यांचा, कामगाराचा, त्यांच्या कुटुंबाचा तुम्हाला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की..! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत