दिल्ली : वेबटीम भारताने 59 चिनी अॅपवर बंदी घातल्याने चीन चांगलाच खवळला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने भारताला धमकावण्यास सुरुवात केलं अस...
दिल्ली : वेबटीम भारताने 59 चिनी अॅपवर बंदी घातल्याने चीन चांगलाच खवळला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने भारताला धमकावण्यास सुरुवात केलं असून भारताविरोधात आर्थिक युद्ध पुकारण्याचा इशारा दिला आहे. याचे परिणाम अतिशय वाईट होतील, असं चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रातून धमकावण्यात आलं आहे.चिनी नागरिकांनी भारतीय वस्तुंवर बहिष्कार टाकला तर एकही भारतीय उत्पादन चीनमध्ये विकले जाणार नाही. यामुळे भारतीयांनी राष्ट्रवादाशिवाय महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींचीही तुम्हाला गरज आहे, असं ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजीन यांनी ट्विट करून म्हटलंय. याशिवाय वेगवेगळ्या लेखातून यामुळे होणाऱ्या भारताच्या नुकसानीचाही इशारा दिला.
सर्वाधिक पसंतीच्या मार्केटमध्ये भारत
एक वर्षापूर्वी भारत चिनी गुंतवणुकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे मार्केट होते. 'भावी वन बिलियन मार्केट' असे संबोधले जात होते. चीन मोबाइल इंटरनेटसाठी महत्वाचे ठरत होते. २०१७ ते २०२० मध्ये भारतात चीनमधून १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली गेली होती. पण आधी करोना व्हायरस आणि आता सीमेवरील तणावाने संबंध बिघडत गेले, असं ग्लोबल टाइम्सने म्हटलंय.
अॅपवरील बंदीचा फटका बसेल, पण...
भारताने चिनी अॅपवर बंदी घातल्याने संबंधित कंपन्यांवर याचा परिणाम नक्की होणार आहे. पण चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकेल इतकी शक्ती भारतात नाहीए, असं ग्लोबल टाइम्सने लिहिलंय.
भारताने जो निर्णय घेतला आहे त्याने चिनी गुंतवणूक आणि व्यापाऱ्यांचा विश्वासाला तडा गेला आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतील. अशा स्थितीत भारत सरकार देशातील राष्ट्रवादाला आणखी प्रत्साहन देत असेल तर डोकलामपेक्षाही मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना भारताला करावा लागेल. यामुळे भारत सरकार परिस्थितीचे वास्तव समजेल आणि विद्यमान संकटाचे रुपांतर धगधगत्या आगीत होण्यापासून रोखेल अशी आपेक्षा आहे, असं म्हणत चीनने धमकावलं आहे. डोकलाम वादावेळी भारताचे आर्थिक नुकसान झाले नव्हते. कारण त्यावेळी द्विपक्षीय संबंध लगेचच सुधारण्यात आले होते. पण द्विपक्षीय संबंध अधिक बिघडले तर भारताला आर्थिक साठमारीचा सामना करावा लागेल, अशी धमकीही चीनने दिलीय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत