राहुरी : वेबटीम सध्या राज्याच्या राजकारणात एकनिष्ठेला फारसे महत्व राहिले नाही, त्यामुळे पक्षाशी वरवर प्रामाणिक दाखवणार्या एकाच नेत्...
राहुरी : वेबटीम
सध्या राज्याच्या राजकारणात एकनिष्ठेला फारसे महत्व राहिले नाही, त्यामुळे पक्षाशी वरवर प्रामाणिक दाखवणार्या एकाच नेत्यांच्या छातीत गांधी, मोदी, ठाकरे अशा घराण्यातील नेते दिसतील, मात्र माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची छाती फाडली तर यात फकत माझे आदर्श, माझे नेते व फकत शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ असलेले राज्यमंत्री प्राजक्त दादाच दिसतील, असा विश्वास उंबरे येथील राहुल पाटील यांनी व्यक्त केला. राहुल पाटील म्हणाले, आजच्या घडीला आम्हा तरुणापुढे प्राजक्त दादा तनपुरे एक आदर्श आहेत, त्यांच्यावर स्व, दादा, तसेच माजी खासदर तनपुरे साहेब , डॉ. उषाताई तनपुरेंचे मोठे संस्कार आहेत, त्यामुळे प्राजक्त दादांच्या स्वभावात नेहमीच नम्रता, समोरच्या विषयी आदर, त्यांचा मितभाषी स्वभाव, सकारात्मक विचार, संवाद कौशल्य, जनतेचे काम करण्याची तत्परता, गोरगरिबांना नेहमी असलेली मदतीची तयारी व तरुणांना वेळोवेळी होणारे मार्गदर्शन यामुळे प्राजक्त दादा आज राहुरीच्या नव्हे तर नगर जिल्ह्यातील तरुणांचे आयडॉल बनले आहेत, सामान्य कार्यकर्ता, नगराध्यक्ष, आमदार आणि मंत्री असा त्यांचा नेत्रदीपक राजकीय प्रवास असतानाही त्यांचा आपला सामान्य कार्यकर्ता, येथील गोरगरीब जनता यांच्याशी संपर्क तुटलेला नाही , त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आजही पहिल्यासारखिच नम्रता व आदरयुक्त भावना आहेत, आपल्याला मिळालेली मंत्रीपदाच्या संधीचा माझ्या जनतेसाठी कसा उपयोग करता येईल, यासाठी माझे प्राजक्त दादा प्रयत्न करत असतात, पक्षाशी आणि जनतेशी ते प्रामाणिक आहेत, आज विखे पाटील ,थोरात साहेब, संजय राऊत एकमेकांच्या छाती फाडून आत नेमके 'कोण' दिसतंय, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मी पेपरमधून वाचलंय, मात्र नेते आपल्या सोयीनुसार छातीत फोटो बदलतात, परंतु माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची छाती फाडली तर तुम्हाला फकत प्राजक्त दादाच दिसतील, असेही राहुल ढोकणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना राहुरी तालुक्यात राज्याचे मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि तहसीलदार, पोलीस निरीक्षक व आरोग्य विभागाने घेतलेल्या परिश्रमामुळे राहुरी तालुका कोरोनामुक्त राहिला असल्याचा आम्हा राहुरीकराना अभिमान असल्याचे उद्गार उंबरेचे उमलते नेतृत्व राहुल पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत