उंबरे : वेबटीम। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर पडवळकर थोडे काही बोलले तर विरोधक पेटून उठले आहेत मात्र ज्यावेळी देशाचे नेते व ...
उंबरे : वेबटीम।
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर पडवळकर थोडे काही बोलले तर विरोधक पेटून उठले आहेत मात्र ज्यावेळी देशाचे नेते व माझे आदर्श असलेल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांवर हेच राष्ट्रवादी बोंबलले त्यावेळी भाजपने त्याचे अशे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही, त्यामुळे भाजपला शांत समजू नये, अंगावर आले तर त्यास उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राहुरी तालुका भाजपचे युवानेते गणेश तोडमल यांनी दिला आहे.. तोडमल म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी कोणी चुकीचे बोलले असेल त्याचे आम्ही समर्थन करणार नाही, मात्र आज जे राष्ट्रवादीवाले गल्लीगल्लीत भाजपाच्या नावाने शिमगा घालत आहेत, तेच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरताना देशाने पाहिले आहे, त्यामुळे आज पवार साहेबांविषयी अभिमान, आदर, सन्मान असे शब्द मिरविणार्यांना दुसऱ्याचा आदर का करता येत नाही, असा सवाल करत give respect and take respect अशी आमची भूमिका आहे , नको त्या गोष्टीचे राजकारण करण्यापेक्षा राज्यातील जनतेला संकटात मदत करा, अन्यथा अंगावर येत असाल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाही, हे लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत