अहमदनगर : वेबटीम आज जिल्ह्यात संगमनेर 3, श्रीरामपूर 2 व अन्य तालुक्यात 16 असे एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशा...
अहमदनगर : वेबटीम
सकाळी जिल्ह्यात १२ रुग्ण बाधित आढळून आले तर सायंकाळी यामध्ये आणखी ९ रुग्णांची भर पडली.आज जिल्ह्यात संगमनेर 3, श्रीरामपूर 2 व अन्य तालुक्यात 16 असे एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ८२ झाली आहे तसेच जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे.
याशिवाय, राजेवाडी (जामखेड) येथील युवक दिल्ली येथे, नव नागापूर येथील व्यक्ती पुणे येथे आणि संगमनेर येथील व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आल्या होत्या. त्या व्यक्ती तेथेच उपचार घेत आहेत. तसेच सारसनगर येथील एक व्यक्ती मुंबई येथे बाधित आढळून आली होती. आज आणखी एका रुग्णाचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव आला. या व्यक्तींची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर आपल्या जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहे त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर यांनी दिली.
*जिल्ह्यातील एकूण बरे झालेले रुग्ण: २६०*
*जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या: ८२*
*एकूण नोंद रुग्ण संख्या: ३५४*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत