केस गळती थांबवायची ; मग नक्की करा हा घरगुती उपाय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केस गळती थांबवायची ; मग नक्की करा हा घरगुती उपाय

  एरंडेल तेलामुळे तुमच्या केसांचं आरोग्य निरोगी होण्यास मदत मिळते. या तेलानं आपल्या केसांचा ३० ते ४० मिनिटांसाठी मसाज करा किंवा तेल रात्...

 
एरंडेल तेलामुळे तुमच्या केसांचं आरोग्य निरोगी होण्यास मदत मिळते. या तेलानं आपल्या केसांचा ३० ते ४० मिनिटांसाठी मसाज करा किंवा तेल रात्रभर केसांना लावून ठेवा. तेलातील पोषण तत्त्वांमुळे केसातील कोंडा, खाज येणे आणि अन्य समस्याही दूर होण्यास मदत मिळते
एरंडेल तेल अतिशय चिकट स्वरुपात असते. यामुळे बहुतांश जण हे तेल वापरणं टाळतात. पण या तेलामुळे तुमच्या केसांना जास्त प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. या तेलामुळे केसांची चांगली वाढ होते आणि त्यांचं आरोग्य देखील निरोगी होण्यास मदत मिळते. या तेलामध्ये रिकिनोलेइक अ‍ॅसिड असतं यामुळे केसांच्या भागातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं सुरू राहते. तेलाचा योग्य वापर केल्यास केसांची गळती कमी होईल. एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण आहेत. यामुळे निर्जीव झालेल्या केसांचीही समस्या दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कोंडा, टाळूला खाज सुटण्याची समस्या कमी होते. तुम्हाला हवे असल्यास एरंडेल तेल अन्य तेलामध्ये मिक्स करूनही केसांना लावू शकता.
 केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी एरंडेलच्या तेलामध्ये एक ते दोन मोठे चमचे आल्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळू आणि संपूर्ण केसांना लावा. हे मिश्रण केसांवर २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि यानंतर हर्बल शॅम्पून केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय केल्यास केस गळती कमी होते. केस घनदाट आणि मजबूत होतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत