महावितरणमध्ये 7 हजार सहाय्यकाना मिळणार नियुक्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महावितरणमध्ये 7 हजार सहाय्यकाना मिळणार नियुक्ती

सोलापूर : वेबटीम जुलै 2019 पासून भरती होऊनही निवड न झालेल्या सात हजार विद्युत सहायक व उपकेंद्र सहायकांना नियुक्‍ती दिली जाणार आहे. ऊर्जामं...

सोलापूर : वेबटीम जुलै 2019 पासून भरती होऊनही निवड न झालेल्या सात हजार विद्युत सहायक व उपकेंद्र सहायकांना नियुक्‍ती दिली जाणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार आता यांची निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी परमेश्‍वर इंगोले यांनी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडे सातत्याने याबाबतीत पाठपुरावा सुरु ठेवला होता. सद्यस्थितीत तरुणांना रोजगाराची खूप गरज असून यादीतील सुशिक्षित बेरोजगार एक वर्ष विनावेतन सेवेत घेऊन त्यांना न्याय द्यावा, असे निवेदनही त्यांनी दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना पाठविले होते. त्यानुसार त्यांनी त्यांना लवकरच निवड जाहीर होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार अखेर नोकरीच्या प्रतिक्षेतील उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचे काम सुरु झाले आहे. आता दोन दिवसांत ही यादी प्रसिध्द केली जाणार असून त्यानंतर संबंधित उमदेवारांना तत्काळ नियुक्‍तीही दिली जाईल, असे सांगण्यात आले. 

ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने प्रतीक्षेतील उमदेवारांना दिलासा 
महावितरणमध्ये विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांनी याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्याला अखेर ऊर्जा मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. जुलै 2019 मध्ये उपकेंद्र सहायकाच्या दोन हजार तर विद्युत सहायकाच्या पाच हजार जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये 25 ऑगस्ट 2019 मध्ये उपकेंद्र सहायक पदासाठी आयबीपीएस या संस्थेने परीक्षा घेतली. तर विद्युत सहायक पदासाठी परीक्षा न घेता दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येते. त्यानंतर दोन्ही पदाच्या सात हजार जागांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित होती. त्यावर आता ऊर्जा मंत्र्यांनी या उमेदवारांची निवड यादी जाहीर करुन त्यांना नियुक्‍ती देण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत