सलुनमध्ये आता फकत कटिंग ; दाढीला परवानगी नाही ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सलुनमध्ये आता फकत कटिंग ; दाढीला परवानगी नाही !

मुंबई : वेबटीम  राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 28 जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दुकान...

मुंबई : वेबटीम 
राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 28 जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दुकानात फकत कटिंग करता येणार असून दाढी करण्यास मनाई घालण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सलूनचालक दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते.
सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सरकारने काही नियम व अटी सांगितल्या आहेत. यात केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनीही मास्क वापरणे बंधनकारक आहे. महत्वाचं म्हणजे केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान, ब्युटी पार्लर, स्पा आणि जीम यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती, परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
सलूनमधून मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने अद्यापपर्यंत सलून उघडण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे.सरकारने सलून पुन्हा सुरु करायला परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली होती. यानंतर आता राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत