तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळ...
तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...
मेष : पळवाटा काढणे नको. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. लेखन कराल. मनोरंजनावर पैसे खर्च होतील. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कार्यक्षेत्रातील नवीन योजना लाभदायक ठरेल. वरिष्ठांशी वादविवादाची शक्यता. उत्तरार्थ उत्तम.
वृषभ : प्रकृतीचे ताळतंत्र सांभाळा. वेगळी चूल मांडू नका. तांत्रिक बाबींत योग्य माहिती हवी. कार्यक्षेत्रात नवीन कार्यारंभ नको. कार्यालयातील वरिष्ठांशी वादाची शक्यता. गुंतवणुकीत जोखीम पत्करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.
मिथुन : मित्रांमध्ये वाद शक्य. नव्या संधी चालून येतील. माहिती, काम व तत्परता ही त्रिसुत्री ठेवावी. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. हितशत्रूंवर विजय मिळवाल.
दिनविशेष: कुमार षष्ठी, छत्रपती शाहू महाराज जयंती; आजचे मराठी पंचांग
कर्क : प्रयत्न करावे लागतील. प्रगतीचा वेग वाढेल. महिलांना आर्थिक लाभ. व्यवहार करताना सावध राहा. गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. जोडीदार आणि कार्यालयीन सहकार्यांकडून सहकार्य लाभेल. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये.
सिंह : सत्ता, राजकारण यांत पडणे नको. महत्त्वाकांक्षा वाढेल. आनंदी दिवस. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. व्यापार, व्यवसाय, उद्योगात प्रगतीच्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिमा उजळेल. नोकरदार वर्गासाठी उत्तम दिवस.
कन्या : अनुकूल स्थिती राहील. नवीन वहिवाट पडेल. चमत्कार घडतील. अनावश्यक खर्चात वाढ होईल. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. कार्यालयीन जबाबदारी पार पाडताना समस्या येतील. मात्र, घाबरू नका.
वृषभ राशीत शुक्र मार्गी: 'या' सहा राशींना अत्यंत लाभदायक; वाचा
तुळ : पायाला त्रास शक्य. व्यावसायिक गणिते फसतील. विक्षिप्त माणसांचा सहवास. धनलाभाची शक्यता. उत्पन्न वाढीचे योग आहेत. मान, प्रतिष्ठा वाढेल. उत्तरार्धात मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : विनाकारण घोर लागेल. विवाद टाळा. प्रतिष्ठा वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. व्यापार, उद्योगात लाभ मिळतील. कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्या दूर होतील. आत्मसंतुष्टीकारक घटना घडतील.
धनु : अति चिकित्सा नको. सहज आनंद प्राप्त होईल. विवाहेच्छूंना विवाहाचे योग. संयम आणि मृदू व्यवहारामुळे वातावरण हलके करण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रू पराभूत होतील. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल.
जगन्नाथ मंदिराची 'ही' १० अद्भूत रहस्ये ऐकली आहेत का? वाचा
मकर : विद्यार्थ्यांना संचित लाभ शक्य. आर्थिक गुंतवणूक जपून करावी. घरातील वातावरण सुसंवादी राहील. परिश्रम जास्त आणि लाभ कमी अशी भावना मनात निर्माण होईल. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.
कुंभ : प्रयत्न वाढवा. नियोजनाखेरीज सुरुवात नको. धावपळ वाढेल. नवीन कार्यारंभात यश मिळेल. विवाहेच्छूंना विवाहाचे योग. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. वाद टाळावेत.
मीन : सुखद दिवस. नवीन वलय प्राप्त होईल. स्वत:ला सुरक्षित ठेवा. संघर्षानंतर यशप्राप्ती होईल. नवीन करार होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याचा दिवस. कार्यालयातील मान, सन्मान वाढेल. जोखीम पत्करून गुंतवणूक करू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत