चीनने एक नाही, तीन ठिकाणी जागा बळकावली ; वाचा कोणी केला गौप्यस्फोट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चीनने एक नाही, तीन ठिकाणी जागा बळकावली ; वाचा कोणी केला गौप्यस्फोट

दिल्ली :  वेबटीम गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं मोदी सरकारवर प्र...

दिल्ली :  वेबटीम
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीन विवादावरून निशाणा साधलाय. शुक्रवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत. 'पंतप्रधानजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय' असं या व्हिडिओ पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय. 'चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलाय आणि आम्ही त्यावर कारवाई करत आहोत, असं पंतप्रधानांनी न घाबरता सांगावं. या परिस्थितीत संपूण देश तुमच्यासोबत आहे' असं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलं.
 'संपूर्ण देश एकत्रितपणे सरकारसोबत उभा आहे. परंतु, एक प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की हिंदुस्तानात कुणीही घुसखोरी केलेली नाही, आपल्या जमिनीवर कुणीही ताबा मिळवलेला नाही. परंतु, सॅटेलाईट फोटो काही वेगळंच सांगत आहेत. सेनेचे माजी जनरल बोलत आहेत तसंच लडाखचे रहिवासी सांगत आहेत की आपली जमीन एका ठिकाणी नाही तर तीन ठिकाणी चीनकडून बळकावण्यात आली आहे' असं राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलंय.
'तुम्हाला खरं बोलावंच लागेल. घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही म्हटलं की जमीन गेलेली नाही आणि चीननं जमिनीवर ताबा मिळवला असेल तर यामुळे चीनचा फायदा होईल. आपल्याला सोबत या प्रश्नाला लढा द्यायचा आहे आणि निकालात काढायचाय' असं आवाहनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केलंय.
 'आपल्या शहीद जवानांना हत्यारांशिवाय सीमेवर कुणी आणि का पाठवलं?' असाही प्रश्न पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत