महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी

अहमदनगर ः वेबटीम    लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवाजवी वीज बिले आहेती. ती रद्द करून या काळातील आकारणीच रद्द करण्याता यावी, या मागणीसाठी...

अहमदनगर ः वेबटीम   
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवाजवी वीज बिले आहेती. ती रद्द करून या काळातील आकारणीच रद्द करण्याता यावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.
या आंदोलनात पक्षाचे राज्य सहसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, आयटकचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर, विडी कामगार नेते शंकर न्यालपेल्ली, भैरवनाथ वाकळे, दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, संतोष गायकवाड, विजय केदारे, अंबादास दौंड, चंद्रकांत माळी, रविंद्र वाबळे, महादेव कोलते सहभागी झाले होते.
यासंबंधी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरणने करोना लॉकडाउनच्या काळातील मीटर रीडिंग न घेता सरासरी बिले पाठवली आहेत. त्यामध्ये अनेकांच्या बिलात वाढ झाली आहे. सर्वसामान्य ग्राहक करोनाच्या संकटकाळात हवालदिल झाले आहेत. त्यातच वीज बिलामध्ये मोठी तफावत असलेल्या जादा रकमेचे वीज बिल ते भरू शकत नाही. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहे. तर अनेकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. मुलांच्या शिक्षणासह दैनंदिन खर्च भागवणे दुरापास्त झाले आहेत. वाढीव बिलाबाबत महावितरणकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत