राहुरी ः राहुरी विद्यापीठाने आज दि. 26 जुन पासून पुढील पाच दिवसांसाठी हवामान आधारीत कृषि सल्ला दिला आहे. त्यानुसार पुढील पाच दिवस ...
राहुरी ः
राहुरी विद्यापीठाने आज दि. 26 जुन पासून पुढील पाच दिवसांसाठी हवामान आधारीत कृषि सल्ला दिला आहे. त्यानुसार पुढील पाच दिवस आभाळ ढगाळ असेल. काही ठिकाणी हलका ते मध्यम सरींचा पाऊस पडेल. ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असेल त्या ठिकाणी वापसा आल्यानंतरच पावसाचा अंदाज काढून पेरणी करावी. पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव व कर्जत तालुक्यात पाऊस झाला तरच पेरण्या कराव्यात तर अन्य तालुक्यात अनुकुल वातावरण आहे. पावसाचा अंदाज घेवून पिकांवर किटकनाशक फवारणी करावीकापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग लागवड करताना हवामानाचा अंदाज घेणे अशा सूचनाही राहुरी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या अधिकार्यांनी केल्या आहेत. दरम्यान, राहुरी विद्यापीठाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता पाच दिवस वातावरण ढगाळ राहणार असून त्यात पावसासाठी ते अनुकुल असणार आहे. त्यामुळे पावसाची अपेक्षा आहे. त्यात शेतीचे नियोजन करताना पावसाचा अंदाज, शेतातील वापसा याचाही अंदाज घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी दर पाच दिवसाला विद्यापीठाचा हवामान अंदाज पाहून पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत