राहुरी : वेबटीम थकीत कर्जामुळे जिल्हा सहकारी बँकेने कारवाईचा इशारा दिलेला,डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी जिल्हा ...
राहुरी : वेबटीम
थकीत कर्जामुळे जिल्हा सहकारी बँकेने कारवाईचा इशारा दिलेला,डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेमार्फत मदत करावी व शेतकऱ्यांची व कामगारांची कामधेनू वाचवावी या आग्रही मागणीसाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे नेते यांनी आज मा.आ. शिवाजीराव कर्डिले यांची बु-हानगर येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व कारखाना चालु करण्यासंदर्भात विनंती केली. याप्रसंगी बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत विषय घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे मा. कर्डिले साहेबांनी सांगितले.यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हा. चेअरमन शामराव निमसे, संचालक सुरसिंगराव पवार, विजय डौले, के.मा. पाटील कोळसे, रविंद्र म्हसे, उत्तमराव आढाव, दत्तात्रय ढुस, अर्जुनराव बाचकर, गणेश चौधरी, नंदु डोळस, महेश पा. शिरसाठ,भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,जेष्ठ नेते बाळासाहेब जठार , किशोर भाऊ वने, उत्तमराव म्हसे, पोपट झुगे, अशोक काळे, नानासाहेब गागरे,शेतकरी संघटनेचे नेते कारभारी पा. कणसे , कामगार संघटनेचे नेते सुरेश थोरात, नामदेव कुसमुडे, नामदेव धसाळ, चंद्रकांत कराळे, किशोर तरवडे व शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत