जामखेड,दि.२४ - जामखेड येथील पोकळेवस्तीवर घरफोडी करून लाखाचा ऐवज चोरणाऱ्या दोन अल्पवयीन गुन्हेगार मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले...
जामखेड,दि.२४- जामखेड येथील पोकळेवस्तीवर घरफोडी करून लाखाचा ऐवज चोरणाऱ्या दोन अल्पवयीन गुन्हेगार मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांनी कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २३ जूनला रात्री फिर्यादी सुदाम रोहीदास पोकळे (वय ४७, रा. पोकळेवस्ती, जामखेड) हे त्यांचे कुंटुबासह बंगल्यामध्ये झोपलेले असतांना अनोळखी गुन्हेगारांनी त्यांचे बंगल्याचे किचन रुमचे पाठीमागील दरवाज्याचा कडी , कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन घराचे कपाटामध्ये टेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण ४ लाख ९० हजार रु. किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी जामखेड पो. स्टे. येथे दिलेल्या फिर्यादी वरून गु.र. नंबर 1 २६३/२०२० भा . द . वि.कलम ४५७ , ३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी , कर्जत विभागाचे
संजय सातव यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी त्यांचे सोबतचे पथकासह सदरचे गुन्हे घडले ठिकाणी भेट देवून गुन्ह्याची माहीती घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे सदर गुन्ह्याचे तपासकामी उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभागाचे संजय सातव व स्थानिक गुन्हे शाखाचे पो. नि. दिलीप पवार , अहमदनगर यांची वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला . सदर गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पोना सुनिल चव्हाण यांना गुप्त खबऱ्याकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा बेलगाव (ता. कर्जत) येथील अल्पवयीन गुन्हेगारांने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या आधारे अल्पवयीन गुन्हेगाराचा शोध घेऊन बेलगाव ( ता . कर्जत) येथून एका अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले . त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत कसुन व सखोल चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे अल्पवयीन साथीदारांचे मदतीने केला असल्याची कबुली दिल्याने त्यावरुन रुई नालकोल (ता. आष्टी जि.बीड ) येथून दुसऱ्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले. दोन्ही अल्पवयीन गुन्हेगारांकडून वरील नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी २ लाख रु.रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. आरोपींना मुद्देमालासह जामखेड पो . स्टे . येथे हजर करण्यात आले आहे . पुढील कारवाई जामखेड पो.स्टे हे करीत आहेत . सदर बाबत कसून चौकशी करण्यात येत आहे . वरील नमुद दोन अल्पवयीन गुन्हेगारांपैकी एका विरुध्द यापुर्वी सांगोला पो.स्टे येथे गु.र.नंबर 1 १३६२ / २०१ ९ भा.द.वि . कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे .
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभागाचे संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार व त्यांचे पथकातील पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्ता हिंगडे, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोना सुनिल चव्हाण, पोना आण्णा पवार , दिनेश मोरे, संतोष लोढे , रविंद्र घुगासे, संदिप पवार, रविद्र कर्डिले, चा.पोहेकॉ बाळासाहेब भोपळे व आर.सी.पी. पथक यांनी ही कारवाई केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत