मुंबई / प्रतिनिधी : WHO च्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आसून मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची...
मुंबई / प्रतिनिधी : WHO च्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आसून मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून
शाळा सुरू करण्यासाठी काढलेलं फर्मान आणि जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले फर्मान ताबडतोब मागे घेण्यात यावे, आशी विनंती.मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे आणी मा.ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणं धोकादायक ठरू शकेल. मुंबई आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्त झाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन, टीव्ही, वर्कबुक, ऍक्टिव्हिटी बुक, प्री लोडेड टॅब अशा सगळ्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत