राहुल गांधींचे चिनसोबतचे संबंध उघड ; पहा हे पुरावे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुल गांधींचे चिनसोबतचे संबंध उघड ; पहा हे पुरावे

दिल्ली : वेबटीम    हिंदुस्थानात चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जागा बळकावल्याच्या आरोप करत पंतप्रधान मोदींना जाब विचारणारे काँग्रेसचे उद्य...

दिल्ली : वेबटीम   
हिंदुस्थानात चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जागा बळकावल्याच्या आरोप करत पंतप्रधान मोदींना जाब विचारणारे काँग्रेसचे उद्याचे पंतप्रधान राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधींचे चीन सोबतचे संबंध  एका पोस्टद्वारे उघड केले असून 2008 ते २०१८ राहुल गांधी आणि कॉंग्रेस हे चीनला फायदा होणारीच कृती करताना दिसुन येत आहे. चीन आणि राहुलच्या या नात्याला नाव काय? असा सवाल फडणवीसांनी केला आहे
फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यात 2008 मध्ये चीन कम्युनिस्ट पार्टी सोबत काँग्रेसतर्फे   mou केला, 2017 मध्ये डॉकलांम वाद सुरू असताना चीन अधिकाऱ्यासंमवेत गुप्त बैठका झाल्या,  2018 ला कैलास मानस सरोवराच्या नावावर चिनी मंत्र्यासोबत बैठक,  2020 मध्ये लडाख तणाव सुरू असताना मोदींवर टीका करून चीनला अप्रत्यक्ष मदत असे आरोप करत 'हा  तर देशाला संकटात आणणारा 'राहू'ल काळ' आशा शब्दात राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे, दरम्यान, या पोस्टवर खूप प्रतिक्रिया सुरू असल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत