आज गुरुवार दि 2 जुलै ; वाचा काय म्हणतेय तुमची रास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज गुरुवार दि 2 जुलै ; वाचा काय म्हणतेय तुमची रास

तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल, जाणून घ्या.. मेष : लिखाण करण्यास चांगला. नवीन तंत्रज्ञान व माहिती ...

तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल, जाणून घ्या..

मेष : लिखाण करण्यास चांगला. नवीन तंत्रज्ञान व माहिती या बाबत काम करावे. मानसिक प्राबल्य वाढेल. वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
वृषभ : पूर्ण क्षमतेने निर्णय घ्या. गरजा पूर्ण होतील. दिवस काही प्रमाणात ताण देणारा. प्रयत्नांना यश मिळेल. कार्यक्षेत्रात शुभवार्ता मिळेल. आप्तेष्ट आणि मित्र सहकार्य करतील. नवीन संधी बदल घडवणाऱ्या ठरतील.
मिथुन : कामाचा गाजावाजा होईल. लाभाचा दिवस. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला. इच्छापूर्तीचा दिवस. मन प्रसन्न राहील. आनंदाचा गुणाकार होईल.

कर्क : चैन कराल. कौटुंबिक साथ मिळेल. वडील मंडळींचे शुभाशीर्वाद लाभतील. भागीदारीतून लाभ मिळतीलच असे नाही. मन विचलित होण्याची शक्यता. वादापासून दूर राहणे श्रेयस्कर ठरेल.
सिंह : व्यायामाने तंदुरुस्ती राखाल. आनंदी दिवस. लक्षवेधी काळ. वाहन हाकताना काळजी घ्या. विचापूर्वक निर्णय घ्यावेत. मन प्रसन्न राहील. नवी ऊर्जा, उत्साह संचारेल. एखादी थक्क करण्याची घटना घडण्याची चिन्हे.
कन्या : भरवशाचे लोक पाठ फिरवतील. वादावादीत अडकाल. वाचन केल्याने ज्ञानात भर पडेल. पराक्रमात वाढ होईल. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे योग आहेत. नोकरदार वर्गाला अपेक्षित लाभ मिळू शकतात. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल.

तुळ : वैवाहिक जीवनातील विसंवाद संपतील. मनात अढी ठेवू नका. कायद्यातील तरतुदी फायद्याच्या राहतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढण्याचे योग. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक : स्वत:तील कला दाखवा. बाजार करणे नको. धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. शिक्षण क्षेत्रात यशाचे मार्ग प्रशस्त होतील. महिला वर्गाचे सहकार्य मिळेल. भावंडांशी असलेले नातेसंबंध दृढ होतील.
धनु : दिवाणी वा न्यायालयीन कामास चांगला दिवस. चक्रव्यूह भेदाल. प्रतिस्पर्धी नामोहरम होतील. समस्या उद्भवू शकतात. संयमाने कामे करावीत. प्रबळ इच्छाशक्तीने प्रगती मार्ग प्रशस्त होतील. नवीन करार लाभदायक ठरण्याचे योग आहेत.
कन्या : स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल; वाचा, मासिक राशीभविष्य
मकर : वाहने नादुरुस्त होतील. व्यवसायात तेजी शक्य. कर्जे सहज फेडाल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. एकूणच आजचा दिवस अनुकूल आहे. लाभाचे योग आहेत. आनंदवार्ता मिळतील.
कुंभ : नवीन उद्योगात स्थिरता येईल. नोकरीत चांगल्या संधी. कर्ज प्रकरणे जरूर करा. कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या वाढतील. आनंदाचा गुणाकार होईल. खर्चातही वाढ होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका.

मीन : सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. कामातून बोलाल. सरकारी सेवक खूष होणार. भाग्याची साथ यश देईल. विरोधक पराभूत होतील. व्यवहारातील कौशल्य आणि बोलण्यातील गोडवा सुख, शांतता देतील. कार्यक्षेत्रात शांत राहून केलेली कामे काहीतरी नवीन आणि शुभ लाभ देण्याचे संकेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत