राहुरी : वेबटीम मुळा धरणाकडे पाणलोट क्षेत्राकडून 443 क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक होत होती. धरण साठ्यामध्ये सुमारे 1 हजार दलघफू ...
राहुरी : वेबटीम
मुळा धरणाकडे पाणलोट क्षेत्राकडून 443 क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक होत होती. धरण साठ्यामध्ये सुमारे 1 हजार दलघफू पाण्याची वाढ झाली. परिणामी धरण साठा 7 हजार 643 दलघफू इतका झाला आहे. धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या राहुरी येथे 286 मिमी तर मुळानगर परिसरात 311 मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी लाभक्षेत्रातच अधिक पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी वाढली. गेल्या दोन दिवसापासून मुळा धरणाकडे तुरळक प्रमाणात नविन पाण्याची आवक सुरू आहे. परंतु सदरचे पाणी हे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेल्या खड्यांमध्ये जात आहे. यामुळे पाणलोट क्षेत्राकडून अजूनही धरणाला अपेक्षित मिळालेले नाही. लाभक्षेत्रातील पावसाच्या कृपेने काहीशा प्रमाणात साठा वाढला. मागिल वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात यंदा पाणी साठा समाधानकारक आहे. मागिल वर्षी धरणामध्ये 4 हजार 700 दलघफू इतकाच पाणी साठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदा बर्यापैकी पाणी मुळा धरणामध्ये शिल्लक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत