राहुरीतील केसापूरमध्ये आणखी एक रुग्ण ; देवळाली प्रवरेच्या अधिकार्यालाही कोरोना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील केसापूरमध्ये आणखी एक रुग्ण ; देवळाली प्रवरेच्या अधिकार्यालाही कोरोना

नगर : वेबटीम  जिल्ह्यातील आज पुन्हा २४ रुग्ण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नगर शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे. राहुरी तालुक्यातील केसा...

नगर : वेबटीम 
जिल्ह्यातील आज पुन्हा २४ रुग्ण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नगर शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे. राहुरी तालुक्यातील केसापूर व देवळाली रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
देवळाली प्रवरा येथील एका विभागातील वरिष्ठ अधिकारी कोरोना बाधित सापडले असून त्यांच्या संपर्कातील तीन सहकारी अधिकाऱ्यांसह वाहन चालकास कोरंटाइन करून त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यामुळे देवळाली प्रवरा परिसरात हा विषय चिंता वाढविणारा ठरला आहे.   श्रीरामपूर येथील  एका विभागातील वरीष्ठ अधिकारी  30 जून रोजी कोरोना बाधित सापडले आहेत.  संबधित विभागाच्या पार पडलेल्या एका बैठकीत  त्या वरिष्ठ अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारयांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवून त्यांना ज्या त्या तालुक्यात कोरनटाइन करण्यात आले होते. त्यानंतर  गुरुवार 2 जुलै रोजी देवळाली प्रवरा कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर त्यांच्या संपर्कातील  त्या विभागातील तीन सहकारी अधिकाऱ्यांसह वाहन चालकाचा स्त्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविन्यात आला असून त्या सर्वांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे विलगिकरणं कक्षात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारपर्यन्त या चौघांचा अहवाल मिळालेला नव्हता. त्यामुळे देवळाली करांच्या मनात धाकधूक कायम होती.देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी अजित निकत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ, डॉ.जाकीर शेख हे परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत तसेच देवळाली शहरात कडक निरबंध घालण्याची मागणी सर्व नागरिक नगरपरिषद अध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे करत आहेत.  दरम्यान राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरा नजीक असलेल्या केसापूर परिसरातील येथील 53 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ, आणसाहेब मासाळ यांनी दिली. दरम्यान  येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात नगर शहरातील १४, भिंगार २, संगमनेर तालुका २ (कुरण आणि एस.बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) १, दाढ बुद्रूक (राहाता) १, खेरले (पाथर्डी) १, भोंदरे (पारनेर) १, केसापूर (राहुरी) १, कोळगाव (श्रीगोंदा) १. रुग्ण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत