मेष : एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या ज...
मेष : एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. आजचा शुभ रंग - पांढरा. वृषभ : कामात चांगली प्रगती कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग- हिरवा. मिथुन: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. आजचा शुभ रंग - निळा. कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - पिवळा. सिंह : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. मीडिया, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपलं काम वेळेआधी पूर्ण करतील. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा. कन्या : एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी चांगली प्रगती करतील. प्रेमी जोडप्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा. तूळ : व्यवसायात चांगलं यश प्राप्त होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - निळा. वृश्चिक : विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. आजचा शुभ रंग - पिवळा. धनु : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - केशरी. मकर : विद्यार्थ्यांना एखादा निर्णय घेण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आज ऑफिसमधील कामं बऱ्याच मेहनतीनंतर पूर्ण होतील. वाद विवाद टाळा. आजचा शुभ रंग - निळा. कुंभ : राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा. मीन : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत