श्रीरामपुरात रस्ता लूट करणारी सराईत टोळी जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपुरात रस्ता लूट करणारी सराईत टोळी जेरबंद

श्रीरामपूर : वेबटीम  रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी नुकतीच  जेरबंद करण्यात आल...

श्रीरामपूर : वेबटीम 
रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी नुकतीच  जेरबंद करण्यात आली.  अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनेे ही कारवाई केली
यासंदर्भात तक्रारदार अंकुश अशोक करंडे (वय- ३२ वर्षे , रा. गोंधवणी , ता . श्रीरामपूर, जि. अहमनगर)  हे हरेगाव (ता . श्रीरामपूर) येथून मोटार सायकल वरुन निमगाव खैरी मार्गे श्रीरामपुर कडे जात असतांना निमगाव खैरी गावचे शिवारात आल्यानंतर पाठीमागून दोन मोटार सायकल आलेल्या चार अनोळखी गुन्हेगारांनी तक्रारदार यांची मोटार सायकल थांबवून त्यांना हाताने मारहाण करुन एटीएम कार्ड , चेक बुक , पॅनकार्ड , मतदानकार्ड , विवो कंपनीचा मोबाईल , मोटार सायकलची चावी आणि रोख रक्कम ४५०० / – रु . बळजबरीने काढुन घेवुन निघुन गेले. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी श्रीरामपुर तालुका पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नंबर । ३०/२०२० भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर पो . नि . दिलीप पवार स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पो . नि . दिलीप पवार यांना गुप्त बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा गोविंद गुंजाळ रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर याने आणि त्याच्या साथीदाराने मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि संदिप पाटील , पोहेकॉ / मनोहर गोसावी , पोना / अण्णा पवार , रविंद्र कर्डीले , दिपक शिंदे, पोकॉ / प्रकाश वाघ , मयुर गायकवाड , सागर ससाणे व चालक पोकॉ / सचिन कोळेकर अशांनी मिळुन श्रीरामपुर येथे जावुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे ( १ ) गोविंद बाळासाहेब गुंजाळ (वय ३२ वर्ष . रा . उक्कलगाव ता.श्रीरामपूर) यास ताब्यात घेतले त्यास विश्वसात घेवुन सदर गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नामे सुदाम सरकाळे , करण गायकवाड व आनखी एक साथीदार असे चौघांनी मिळुन केला असल्याची कबुली दिली . आरोपी सुदाम सरकाळे व करण गायकवाड यांचे टावठिकाणा बाबत व गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे साथीदार हे गढी , ता . गेवराई जि . बीड येथे असुन चोरलेला मुद्देमाल त्यांचेकडे असल्याचे सांगीतल्याने सदर माहितीच्या अधारे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गढी , ता . गेवराई जि . बीड येथे जावुन आरोपींचा शोध घेवुन आरोपी नामे ( २ ) सुधीर उर्फ सुदाम कडुबाळ सरकाळे वय २३ वर्ष रा . शहरटाकळी , ता . शेवगाव ( ३ ) करण नवनाथ गायकवाड वय १८ वर्ष , रा . निपाणीवडगाव , ता . श्रीरामपुर ह.रा. पढेगाव ता.श्रीरामपुर यांना ताब्यात घेतले आरोपी कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ८००० / – रु . किमतीचा वीवो कंपनीचा मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली ७५००० / – रु . किमतीची विना क्रमांकाची टीव्हीएस कंपनीची अपाची मॉडेल मोटार सायकल असा एकुण ८३००० / – रु . किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . तसेच चौथ्या साथीदाराचा शोध घेतला पंरतु तो मिळुन आलेला नाही . वरील नमुद आरोपींना जप्त मुद्देमालासह श्रीरामपुर तालुका पो.स्टे . ला हजर करण्यात आले असुन पुढील कारवाई ही श्रीरामपुर तालुका पो.स्टे . हे करीत आहेत . आरोपी कडुन जप्त करण्यात आलेली अपाची मोटार सायकल ही वैजापुर जि . औरंगाबाद येथुन चोरी केल्याची कबुली दिली असुन सदर मोटार सायकल चोरी बाबत वैजापुर पो . स्टे . गु . र . नंबर । ४१३ / २०१ ९ भा . द . वि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द यापूर्वी विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत