अहमदनगर ः वेबटीम एकेकाळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यात गणले जाणारे म ाजी म ंत्री मधुकरराव पिचड यांनी अनपेक्षितपणे पवासाहेबांची स...
अहमदनगर ः वेबटीम
वैभव पिचड हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी गाव पातळीवर सरपंचांना करोना संबंधी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोपीचंद पडळकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पडळकर यांनी पंढरपूरमधील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत,' असं पडळकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ते पडळकरांचे वैयक्तिक मत असल्याचं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पवारांचे जुने अनुयायी असलेले मधुकर पिचड यांना ही टीका सहन झाली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांचे पुत्र वैभव यांनीही आपलं मत मांडलं.
'पवारांचं नेतृत्व राज्यव्यापी आणि देशव्यापी आहे. गेली ५० वर्ष ते अविरतपणे जनतेची कामे करत आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ माणसाचा आपल्याकडं अनादर केला जात नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल कोणी चुकीचा शब्द वापरला असेल तर त्या व्यक्तीला देखील समजून सांगण्याची गरज आहे. चुकीला चूक म्हणणे हे संस्कार आपल्याला वडिलधाऱ्या मंडळींकडून मिळाले आहेत. पडळकरांचं वक्तव्य चुकीचंच आहे,' असं वैभव पिचड यांनी ठामपणे सांगितलं.
एकेकाळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यात गणले जाणारे म ाजी म ंत्री मधुकरराव पिचड यांनी अनपेक्षितपणे पवासाहेबांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर अकोलेतून त्यांचे सुपुत्र आमदार वैभव पिचड यांनी भाजपाकडून उमेदवारी केली होती. दुर्दैवाने ते प्रथमच पराभूत झाले. त्यानंतर आजपर्यंत एकप्रकारे त्यांचे या नव्या पक्षात मन रमत नसल्याचेच देहबोलीवर ओळखले जात आहे. राष्ट्रवादीशी पिचड घराण्याचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. अगस्ती कारखान्यापासून अन्य छोट्या-मोठ्या वास्तूमध्ये शरद पवार साहेबांचे योगदान आहे, हे पिचड यांनाही माहिती आहे. याशिवाय त्यांना सोडल्यानंतर आमदारही गेली, याची जाणीव त्यांना झाली असावी, म्हणून नुकतेच शरद पवार यांच्याविषयी झालेल्या पडळकरांच्या बेताल वक्तव्यावर भाष्य करताना माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यानंतर माजी आ. वैभव पिचड यांनीही कौतुकांचा वर्षाव केल्याने राजकीय विश्लेषकांमधून पिचड यांची पुन्हा राष्ट्रवादीकडे ही ओढ असल्याचेही सांगितले जात आहे.
वैभव पिचड हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी गाव पातळीवर सरपंचांना करोना संबंधी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोपीचंद पडळकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पडळकर यांनी पंढरपूरमधील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत,' असं पडळकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ते पडळकरांचे वैयक्तिक मत असल्याचं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पवारांचे जुने अनुयायी असलेले मधुकर पिचड यांना ही टीका सहन झाली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांचे पुत्र वैभव यांनीही आपलं मत मांडलं.
'पवारांचं नेतृत्व राज्यव्यापी आणि देशव्यापी आहे. गेली ५० वर्ष ते अविरतपणे जनतेची कामे करत आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ माणसाचा आपल्याकडं अनादर केला जात नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल कोणी चुकीचा शब्द वापरला असेल तर त्या व्यक्तीला देखील समजून सांगण्याची गरज आहे. चुकीला चूक म्हणणे हे संस्कार आपल्याला वडिलधाऱ्या मंडळींकडून मिळाले आहेत. पडळकरांचं वक्तव्य चुकीचंच आहे,' असं वैभव पिचड यांनी ठामपणे सांगितलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत