राहुरीत कोरोनाचे चार रुग्ण ; तर जिल्ह्यात 25, वाचा कुठं कुठं ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत कोरोनाचे चार रुग्ण ; तर जिल्ह्यात 25, वाचा कुठं कुठं !

राहुरी  ः वेबटीम  राहुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून काल एकाच दिवशी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उ...

राहुरी  ः वेबटीम 
राहुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून काल एकाच दिवशी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४,राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत.
नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ केडगाव येथील ०१ आणि भूषणनगर येथे ०१ रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ०३, वांबोरी येथे ०१ रुग्ण आढळला आहे. शिरुरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. पाथर्डी मधील वामनभाऊनगर येथे एक बाधित रुग्ण, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील ०१ आणि ओमनगर येथील ०२, शिर्डी (ता. राहाता) येथील ०१, आणि खैरे निमगाव (ता. श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला आहे.    सकाळी राहुरी तालुक्यातील केसापूर येथील तिघे आणि वांबोरी परिसरातील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, आतापर्यंत तहसीलदार शेख व पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी तालुक्यात कोरोनाला शिरकाव करू दिला नव्हता. मात्र काल प्रथमच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने जनतेला दक्षतेच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, या रुग्णांची पास्ट हिस्टरी तपासली जात आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत