श्रीरामपूर : वेबटीम जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात 10 रुग्ण नव्याने आढळून आले असून त्यात श्रीरामपुर शहरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्...
श्रीरामपूर : वेबटीम
जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात 10 रुग्ण नव्याने आढळून आले असून त्यात श्रीरामपुर शहरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे सर्व रुग्ण एकाच कुटूंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहरात दोन दिवसांपुर्वी एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर संबधितांच्या घरातील अन्य सदस्यांने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, या स्वॅबचा अहव ाल सकाळी आला असून त्यात संबधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी पाच रुग्णांना कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील चार रुग्ण हे संबधित कोरोना बाधित रुग्णाने कुटूंबातील असून अन्य एक जण त्यांचा वाहन चालक असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत