नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले व अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेले भंडारदरा धरणाची लवकरच शतकपुर्ती होणार आहे. त्यामुळे येथे आतंकवा...
नगर
जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले व अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेले भंडारदरा धरणाची लवकरच शतकपुर्ती होणार आहे. त्यामुळे येथे आतंकवादी संघटनेकडून घातपात घडू नये, यासाठी आज बाँम्बशोधक पथकाने धरणावर जावून कडेकोट तपासणी केली. राजेश घोळवे या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली बाँम्बशोधक व दहशतवाद विरोधी पथकाने भंडारदरा धरणावर धाव घेत तेथील तपासणी केली. यावेळी अनेक उणीवा जाणवल्याने जलसंपदा अधिकारी व कर्मचार्यांचे चांगलेच कान टोचल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून ही तपासणी केली जात असल्याचे राजेश घोळवे यांनी सांगितले.
या तपासणीवेळी डिटेक्टर, स्वाँन आदींच्या मदतीने चार-पाच तास धरण परिसरात कानाकोपर्यात जावून पाहणी करण्यात आली. यावेळी पावर हाऊसची देखील तपासणी करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत