चंद्रभागेत पाणी होतं ; पण वारकरी नव्हते..! ; यंदा दिसली सुनीसुनी पंढरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चंद्रभागेत पाणी होतं ; पण वारकरी नव्हते..! ; यंदा दिसली सुनीसुनी पंढरी

अहमदनगर ः वेबटीम  दरवर्षी आषाढीला 15 लाखापेक्षा अधिक भाविक पंढरपूरला येतात. त्यामुळे पंढरपूरला वारकर्‍यांचा महापूर आल्याचेच पहायला मिळत...

अहमदनगर ः वेबटीम 

दरवर्षी आषाढीला 15 लाखापेक्षा अधिक भाविक पंढरपूरला येतात. त्यामुळे पंढरपूरला वारकर्‍यांचा महापूर आल्याचेच पहायला मिळते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच वारकर्‍यांची ही वारी चुकली. त्यामुळे आषाढी एकादश, बारसीलाही पंढरी सुनीसुनी वाटत होती. 

 पंढरपूर यात्रेसाठी गावोगावातून दिंडीने पायी जाणारे वारकरी मुक्कामी थांबतात, तो परिसरही आता निर्मूनुष्य दिसून आला. चंद्रभागेला पाणी होते मात्र स्नान करण्यासाठी वारकरी नव्हते, असे हे दृश्य वारकर्‍यांच्या भावनेला  वेदना देणारे होते. एकादशीला गर्दी नाही, असा रस्ता शोधूनही सापडला नसता मात्र सध्या पंढरपुरात येणारे सर्वच रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. 
एकूणच पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढ असलेल्या वारकर्‍यांची ही वारी चुकल्याने साक्षात पांडुरंगालाही आपल्या भक्तांची गैरहजेरीने निर्माण झालेले हे दृश्य पाहून दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, अशीच भावना वारकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत