अहमदनगर ः वेबटीम वाकी परिसरातील कृष्णवंती नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे असलेले गोण्या सापडल्या होत्या. त्यात 25 वर्षाचा तरूणाचा मृतदेह अस...
अहमदनगर ः वेबटीम
वाकी परिसरातील कृष्णवंती नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे असलेले गोण्या सापडल्या होत्या. त्यात 25 वर्षाचा तरूणाचा मृतदेह असल्याचा अंदाज होता. पोलिसांनी शिताफीने तपास करत हा मृतदेह खिरविरे येथील प्रदीप सुरेश भांगरे यांचा असल्याचे शोधून काढले. त्यानंतर त्याचा खून करणारे कमलाकर हनुमंत डगळे व हरी कमलाकर डगळे (दोघे खिरविरे) अशी आरोपींची नावे समोर आली आहेत.
या घटनेची माहिती अशी की, प्रदीप भांगरे हा कमलाकर डगळे यांच्या मुलीचा मुलगा आहे. त्याचे आणि कमलाकर याचे गेल्या चार महिन्यापुर्वी किरकोळ वाद झाले होते. गेल्या आठवड्यातही त्यांचे पुन्हा वाद झाले होते. तेव्हा प्रदीप याने कमलाकर यांना मारहाण केली होती. हा राग मनात धुमसत असल्याने कमलाकर याने प्रदीप एकटा असताना त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला मारून टाकले होते. त्यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची या चिंतेतून त्याने आपला मुलगा हरि यास घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या दोघांनी मिळून प्रदीपच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले व गोण्यामध्ये भरून ते नदीपात्रात टाकून दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत