कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल ड यादी जाहीर झाली आहे.या यादीमध्ये अनेक कुटुबांना अपात्र ठरविण्यात आ...
कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल ड यादी जाहीर झाली आहे.या यादीमध्ये अनेक कुटुबांना अपात्र ठरविण्यात आले आले.प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोपरगाव तालुक्यात ड यादीतील जवळपास अठरा हजार कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी निकषांची पूर्तता करत चौदा हजार कुटुंबाचा पात्र यादीत समावेश करण्यात आला आहे.चार हजार पेक्षा जास्त कुटुबांना अपात्र ठरविण्यात आले आहे.गोर गरिब या चार हजार कुटुबांना न्याय देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.या चार हजार कुटुबांना बहुतांश घरे नाहीत,वस्तस्थितीने बघितल्यास हे कुटुंबे या निकषात बसत असतांना त्यांना डावलण्यात आले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात प्रंचड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.असे प्रतिपादन शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले आहे.अँटो डिलिट या सबबी खाली या कुटुबांना वगळण्यात आले आहे.अँटो डिलिड झालेल्या या लाभार्थांना न्याय मिळावा यासाठी जाचक अटी कमी कराव्यात. शासकीय स्तरावर अधिकारी वर्गाने लक्ष घालणे गरजेचे होते. या चार कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी तहसीलदार विजय बोरुडे,पंचायत समितीचे बिडीओ साहेब,ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार साहेब,शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की,लवकरात लवकर या चार हजार कुटुबांना हक्काचे घरकुल देण्यात यावे. या आवास योजनेसाठी जाचक अटी कमी करुन गोर गरिब कुटुबांना न्याय द्यावा असे निवदन २५ जानेवारी २०२२ रोजी देण्यात आले होते.या निवदनात पुढे म्हटले की,तत्काळ या लाभार्थांना न्याय न मिळल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला होता.अद्यापही प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाली होतांना दिसत नाही.त्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ फेब्रुवारी आमरण उपोषण सुरू केले जाणार आहे.असे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी प्रशासनाला इशारा देत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.तसेेेच डावलण्यात आलेल्या कुुुुटुंबानी या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत