देवळाली/वेबटीम:- मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य ,सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ आणि राजर्षी शाहू महाविद्यालय,देवळाली प्रवरा र...
देवळाली/वेबटीम:-
मतदान दिनाच्या दिवशी नागरिकांची कर्तव्य,मुलभूत अधिकार,न्याय हक्क या सगळ्या गोष्ठीची सांगड घालून युवकांना मतदानाविषयी जागरूक राहण्यासंदर्भात मागर्दर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.स्वाती हापसे हे होत्या. त्यांनी युवकांना कुठल्याही भूल-थापा व आमिष यांना बळी न पडता निस्वार्ती पणे मतदान केले पाहिजे असे आव्हान केले.प्रा.राजू साळवे यांनी विध्यार्थ्यांना मतदान जनजागृती विषयी शपथ दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे परिचय राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतिश कटके यांनी करून दिले.व सूत्रसंचालन रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.बाळासाहेब फुलमाळी यांनी केले व आभार हि त्यांनी मानले.या आभासी कार्यक्रमासाठी प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत