कोपरगाव वार्ताहर :- श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची लवकर कोरोनातून...
कोपरगाव वार्ताहर :-
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची लवकर कोरोनातून मुक्ती व्हावी व त्यांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीला पायी जावून साईबाबांना साकडे घातले आहे. तर संवत्सरमध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात आरती करून प्रार्थना केली आहे.
ना.आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र प्रकृती उत्तम असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती जरी उत्तम असली तरी त्यांनी लवकरात लवकर कोरोनावर मात करावी.यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना सोशल मेडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु दवा के साथ दुवा पण तेवढीच महत्वाची आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार (दि.२७) रोजी कोपरगाव येथील साईबाबा तपोभूमी ते शिर्डी येथे पायी जावून ना.आशुतोष काळे यांची लवकरात लवकर कोरोनातून मुक्तता व्हावी यासाठी साईबाबांना साकडे घातले. तसेच राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, जुनीगंगा जगदंबा देवी मंदिर येथे देखील पार्थना केली.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विरेन बोरावके, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनिल बोरा, बाळासाहेब रूईकर, इम्तियाज अत्तार, निखील डांगे,राजेंद्र आभाळे, धनंजय कहार, कार्तिक सरदार, एकनाथ गंगूले, वाल्मिक लहिरे, दिनेश पवार, नारायण लांडगे, महेश उदावंत, संदिप सावतडकर, ऋतुराज काळे, राजेंद्र खैरनार,मनोज नरोडे, विकास बेंद्रे,भाऊसाहेब भाबड, प्रसाद उदावंत, महेश लवांडे, गणेश बोरुडे, महेश खडांगळे, गणेश शिंगाडे, जय बोरा, पुंडलिक वायखिंडे, कुलदीप लवांडे, विशाल कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात आरती करून ना. आशुतोष काळे यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पार्थना केली.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बाराहाते, दिलीपराव बोरनारे, अॅड.शिरीष लोहकणे, ग्रा. पं.सदस्य तुषार बारहाते, बाबासाहेब कासार, साहेबराव भोसले, सुनील कुहिले, संजय काळे, पांडुरंग भोसले, अविनाश भाकरे, अखिलेश भाकरे, मारुती वरघुडे, गणेश गुंड, निलेश तळे, गुलाब शेख, सुनील गवळी, दीपक वालझाडे, साहिल शेख आदींसह संवत्सर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत