श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहाने संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहाने संपन्न

कोपरगाव/वेबटीम:- आज दिनांक २५जानेवारी येथे *राष्ट्रीय मतदार साक्षरता दिवस* श्रीमान गोकुळचंदजी विदयालय,कोपरगांव येथे साजरा करण्यात आला.कार्यक...

कोपरगाव/वेबटीम:-



आज दिनांक २५जानेवारी येथे *राष्ट्रीय मतदार साक्षरता दिवस* श्रीमान गोकुळचंदजी विदयालय,कोपरगांव येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कोपरगांवच्या निवासी तहसिलदार मनिषा कुलकर्णी होत्या. 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील कु.प्रथमेश कुलकर्णी,कु.तनया संत,तन्मय निकम,सुयश जाधव आदि विदयार्थीनी मतदार साक्षरता दिना बद्दल आपले विचार व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक मध्ये लोकशाही देशामध्ये मतदानाचे महत्व , लोक प्रतिनिधी कसे असावेत,लोकशाहीत मतदारांची भूमिका यासारख्या विविध विषयांवर मुलांना मार्गदर्शन केले व मतदानाचे महत्व  पटवून दिले. त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री .गायकवाड आर. बी. यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर लोकप्रतिनिधी निवडतांना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात व लोकशाहीचे हात कसे बळकट होतील,याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या  शेवटी निवडणुक विभाग शाखा प्रमुख अरुण रनवरे मतदार प्रतिज्ञाचे विद्यार्थ्यांसह वाचन केले.विद्यार्थ्यांकडून मतदार जागृती घोषवाक्य वदवून घेतली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.सुरेश गोरे यांनी केले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षिका यु. एस.रायते, उपशिक्षक  श्री उल्हारे बी.सी,बी.बी.कुळधरण,एन.के.बडजाते,श्री.ए.के.काले,व्हि.एन.कार्ले,होनसर,देसाईसर,एस.एन.शिरसाळे आदी कार्यक्रमास सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत