कोपरगाव/वेबटीम:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला नुकतीच पदश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांनी भेट दिली.त्यांचा सत्कार कोपरगांव एज्युके...
कोपरगाव/वेबटीम:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला नुकतीच पदश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांनी भेट दिली.त्यांचा सत्कार कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे व सचिव दिलीप अजमेरे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी बोलतांना पदश्री राहीबाई पोपेरे यांनी रासायनिक खतांनी केलेली शेती नुकसान कारक असुन त्यामुळे जमिनिचा पोत कमी होवुन क्षारयुक्त होते.त्यामुळे पारंपारीक बियाणांच्या जतन आणि संवर्धनाने आणि विषमुक्त शेती करुन चांगले संकरीत अन्नधान्य व भाजीपाला पिकवु शकतो असे त्यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.पुर्वी तयार होणाऱ्या रानभाज्या जणु हरवल्यासारख्या झाल्या आहे त्या परत शोधुन त्यांचा समावेश आहारात होणे आवश्यक आहे असे त्यांनी या प्रसंगी नमूद केले. सध्या कीचन गार्डन ही संकल्पना राबवाली पाहीजे असे त्या म्हणाल्या.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी राहीबाईचे कार्य महानअसून नव्या पिढीला दिशादर्शक आहे त्यामुळे संतुलीत आहार मिळाल्याने पुढची पिढी सुदृढ होण्यास मदत मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला संस्थचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे ,डाॕ.अमोल अजमेरे,स्वप्निल मालपुरे,नगरपालिका स्वच्छता अधिकारी महारुद्र गलाट, सौ.अजमेरे मॕडम,श्रीमती यु.एस.रायते ,
सौ.एस.एम.मालपुरे,राजाभाऊ गंगवाल,गोदामाई प्रतिष्ठाणचे आदिनाथ ढाकणे आदि सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत