कोपरगाव/वेबटीम:- आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक मा बाळासाहेब ठाकरे यांचे संघटन कौशल्य प्रेरणादायी आहे असे प्र...
कोपरगाव/वेबटीम:-
आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक मा बाळासाहेब ठाकरे यांचे संघटन कौशल्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले
आझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने या दोन्ही महा पुरुषांना अभिवादन करण्यात आले
या वेळी बोलताना पोळ म्हणाले की या दोन्ही पक्ष प्रमुख यांच्या दरम्यान एक साम्य होते त्यांच्या मध्ये देशप्रेमाची प्रचंड ऊर्जा होती आपल्या मेहनत आणि बुद्धी कौशल्यावर या दोन्ही महापुरुषांनी संघटनेची बांधणी केली व आपल्या विचारांचे बीज संघटनेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात रुजवले असून
सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या संघटन कौशल्यावर देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आझाद हिंद सेना स्थापन केली तर शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना सर्व सामान्य जनतेच्या मनात रुजवली आहे परिवर्तन चळवळीत काम करत असताना व संघटनेची बांधणी करत असताना या दोन्ही महापुरुषांचे संघटन कौशल्य सतत प्रेरणादायी राहील असा विश्वास वाटतो
या निमित्ताने कोपरगाव शहरात सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे व नगर पालिकेने शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत