आंबी/वेबटीम:- श्रीरामपूर येथील प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूलचे उपशिक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक १३१ चे मतदान केंद्...
आंबी/वेबटीम:-
श्रीरामपूर येथील प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूलचे उपशिक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक १३१ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सागर दत्तू माळी यांना अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ पुरस्कार १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घोषित केला.
माळी यांनी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार यादी निरंतर व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार यादीमध्ये नावमतदारांची नोंदणी, दुरुस्ती, वगळणी, आयोगाने वेळोवेळी घोषित केलेले विविध उपक्रम आपल्या प्रभागात राबविले. तसेच शालेय कामकाज सांभाळून निवडणूक शाखेत मतदार नोंदणी व इतर निवडणूक विषयक कामकाज केले. जिल्ह्यात उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कृत झालेले उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याबरोबर सागर माळी यांनाही उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्याच्या शिरपेचात दुहेरी तुरा रोवला गेला आहे. मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलओ यांचा आहे अशी भावना माळी यांनी व्यक्त केली.
माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार अशोक उगले, प्रभारी नायब तहसीलदार अर्जुन सानप, महसूल सहायक संदिप खाडे, शिवाजी गायकवाड, संदिप पाळंदे, प्रितेश तांदळे यांचेसह मतदारसंघातील सर्व बीएलओ व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत