कोपरगाव/वेबटीम:- तालुक्यातील वारी येथील चंद्रशेखर लक्ष्मणराव खवले यांचे गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोनामुळे अल्पवयातच निधन झाले होते. ते ना...
कोपरगाव/वेबटीम:-
तालुक्यातील वारी येथील चंद्रशेखर लक्ष्मणराव खवले यांचे गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोनामुळे अल्पवयातच निधन झाले होते. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे नोकरीस होते. परंतु, गावाकडे त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात याच भावनेतून त्यांचे चिरंजीव रोहित खवले व कुटुंबीयांनी वारी येथील रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, जगदंबा देवी मंदिर ट्रस्ट व शनेश्वर मंदिर देवस्थान येथील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वर्गीय चंद्रशेखर यांच्या स्मरणार्थ बुधवारी (दि.२६) चार सिमेंटचे बाकडे भेट दिले आहे.
गावातील मंदिर परिसरात बाकडे उपलब्ध करून दिल्याने भाविक भक्तांना दर्शनानंतर या बाकड्यावर क्षणभर विश्रांती घेता येणार आहे. आपल्या कुटुंबातील स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीच्या सामाजिक बांधिलकीतून स्मृती जागवण्याच्या खवले कुटुंबियांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी भानुदास खवले, चंद्रकांत खवले, रामप्रसाद खवले, कृष्णा खवले, वैभव खवले, गिरीश खवले, समीर खवले, शिव खवले, सिद्धी खवले यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, मित्र परिवार यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.
-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत