देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना भाजपकडून मला सवतीची वागणूक दिली गेली.महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मी भा...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना भाजपकडून मला सवतीची वागणूक दिली गेली.महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मी भाजपाच्या ताब्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगर पालिकेस भुमिगत गटार व स्मशानभूमीसाठी मोठा निधी दिला आहे.आम्ही माञ निधी देण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही असे ना.प्राजक्त तनपुरे म्हणाले. त्यानंतर मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे बघून भुमिगत गटार पुर्ण झाल्यावर तरी बोलवा असे म्हणून देवळाली प्रवरास सर्वाधिक निधी द्यावा यासाठी कोणते नगरसेवक माझ्याकडे प्रयत्न करीत होते.त्यांची नावे निवडणूकीच्या प्रचारात जाहिर करील असे उर्जाराज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल माजी सैनिकांचा राज्यमंञी तनपुरे यांनी स्वतः प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान केला.त्यावेळी ना.तनपुरे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते.यावेळी आर्दश पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे, शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अदिनाथ कराळे, माजी नगरसेवक बाळासाहेब खुरुद, सतिष वाळुंज,केदारनाथ चव्हाण,माजी नगरसेवक सचिन ढुस, मुख्याधिकारी अजित निकत आदी उपस्थित होते.
यावेळी ना.तनपुरे बोलताना म्हणाले की, देशेच्या सिमेवर सैनिक असल्याने आपण सर्वजन मोकळा श्वास घेवू शकतो.माजी सैनिकांच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. माजीसैनिकांसाठी माझे दार सदैव उघडे आहे.दोन अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्ताधाऱ्यांकडून कामे का झाली नाही.परंतू देवळाली प्रवरा नगर पालिकेतील काही नगरसेवकांनी मला गळ घालून भुमिगत गटार व स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली.त्यानुसार जिल्हाधिकारी यांना संपर्क करुन प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले.असे ना.तनपुरे यांनी सांगितले.
ना.तनपुरे पुढे म्हणाले की, मी राहुरी नगर पालिकेचा नगराध्यक्ष असताना राज्यात भाजपाची सत्ता होती.त्यावेळी मला सवतीची वागणूक मिळत होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर पालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात आहे. हे न पाहता नागरीकांच्या सोयीसाठी जलदगतीने कामास मंजुरी देवून निधी वर्ग केला आहे.आमच्या सरकारने तुम्हाला निधी दिला. भुमिगत गटारीचे काम पुर्ण झाल्यावर तरी आम्हाला बोलवा असे मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे पाहत इशारा करताच एकच हश्शा पिकला.नगर पालिकेस चांगला निधी मिळावा यासाठी अडचणी येवू नये म्हणून देवळाली प्रवराचे काही नगरसेवक माझ्या कायम संपर्कात होते. त्यांनी कामाची अडवनूक होवू नये याची दक्षता घेतली. त्यांची नावे नगर पालिका निवडणूकीच्या प्रचारात जाहिर करणार आहे.असे हि ना.तनपुरे यांनी सांगितले.
ना.तनपुरे यांनी माजी सैनिक प्रभाकर महांकाळ,ज्ञानदेव चव्हाण,दत्ताञय कडू,ज्ञानदेव पठारे,दिलीप गुलदगड,सुधीर नाकाडे,प्रविण पठारे, विलास उंडे,चेतन गिरमे, गोविंद राऊत, चंद्रकांत देशमुख आदींचा सन्मान केला.
'रामाचा' दोन्ही थड्यावर हाथ!
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दोन नगरसेवकांना सत्यजित कदम यांचे पाठीराखे राम- लक्ष्मण म्हणून उपाधी मिळालेले.राम राष्ट्रावादीतून भाजपात दाखल झाले आहे. राम माञ फार हुषार आहे.आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ना.तनपुरे यांच्या कायम संपर्कात राहत आहे. माजी सैनिकांचा सन्मान कार्यक्रमात 'राम' ना.तनपुरे यांच्या स्वागतासाठी अग्रक्रमांकावर होते.यावरुन 'रामा'Iचे दोन्ही थड्यावर हात ठेवले आहेत.अशी उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु होती.
आम्ही निधी अडविणारे नाही
नगर पालिकेत सत्ता कोणाची असो विकास कामे होणे गरजेचे आहे.भाजपाची सत्ता असताना भाजपाची सत्ता नसलेल्या नगर पालिकेचा निधी अडविला जात होता.महाविकास आघाडी सरकार माञ सत्ता कोणाची आहे. हे पाहत नाही नागरीकांच्या विकास कामाचा निधी अडविला जात नाही.तुमच्या सरकारच्या काळात भुमिगत गटार व स्मशानभूमीचा प्रश्न का सुटला नाही.महाविकास आघाडीने भुमिगत गटारीस मंजुरी देवून निधी वर्ग केला आहे. आम्ही कोणाचाही निधी अडवित नाही असे ना.प्राजक्त तनपुरे यांनी सांगताच खालुन वजन कमी पडले असेल अशी टिपण्णी करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत