कोपरगाव/वेबटीम:- प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील विकासकामांचे भूमिपूजन युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते केल्याचा जळफळाट होऊन अपघाती...
कोपरगाव/वेबटीम:-
प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील विकासकामांचे भूमिपूजन युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते केल्याचा जळफळाट होऊन अपघाती शहरप्रमुख झालेल्या कलविंदरसिंग दडीयाल यांनी सच्चा शिवसैनिक कोण याचे दाखले देऊ नये अशी विखारी टीका सागर जाधव यांनी केली आहे.
कोपरगाव शहरात कोल्हे कुटूंब हे वंदनीय शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती पुण्यतिथीला अभिवादन करण्यास येतात. या उलट दडीयाल यांनी ज्यांचे बाहुले म्हणून टीका केली ते विद्यमान आमदार काळे व त्यांचे वडील स्वतः शिवसेनेचे आमदार असतांना कधीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यास वेळ काढला नाही ही वस्तुस्थिती जाणून मगच भाष्य करावे.
दडीयाल यांना शिवसेनेत येऊन अद्याप त्यांना शिवसेना हा उल्लेखही धड करता येत नाही.
आमदार काळे यांनी वारंवार राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या असे आवाहन केले आहे, कुठेही महाविकास आघाडी उल्लेख नाही., सच्चे शिवसैनिक आणि आदेश हे आम्हाला काळे सेनेच्या माणसाने शिकवु नये. काळे यांच्याकडे सेना गहाण ठेवन्याचा डाव असेल तर दडीयाल यांनी माजी आमदार काळे यांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसैनिकांना वंदनीय असलेल्या सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या बद्दल केलेले वक्तव्ये स्वतःच्या आजू बाजूच्या नेत्यांना विचारले तर ते ही त्यांना जुना इतिहास सांगतील.
काळे कुटूंबाला शिवसेनेने दोन वेळा आमदारकी दिली ते शिवसेनेशी कसे वागले आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे अजून नवपन फिटले नाही अशा शिवसेनेत नवख्या असलेल्या दडीयाल यांनी खऱ्या शिवसैनिकांबद्दल बोलतांना शब्द जपून वापरावे.
कोल्हे परिवार हा सेनेचा सन्मान ठेवणारा परिवार आहे, कारण जे शब्द त्यांनी शिवसैनिकांना दिले ते ते सत्तेची पदे असो की सन्मानाची वागणूक देऊन पूर्ण केले आहेत, याउलट स्वतःच्या पोळीवर तूप ओढणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना एकहाती सत्ता पाहिजे असेल तर कुठे नेऊन ठेवणार आहात शिवसेना अशी विचारणा सच्चा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. बिल्ले आणि मफलरी विकण्याच्या स्वतःच्या मोहापायी शिवसेनेत दुफळी पाडण्याचा प्रयत्न शहरप्रमुख या पदावर राहून करू नये व माजी आमदार काळेंच्या काळात याच मफलरी आणि बिल्ल्यांच्या बिलापाई डोळे ओले करण्याची वेळ कुणावर आली होती हे आठवावे.
कैलास जाधव व सागर जाधव आणि शिवसेना हे नाते शहराला माहीत आहे, त्यामुळे दडीयाल यांनी सच्चे आणि कच्चे काय हे जनतेसमोर ठेवण्यास भाग पाडू नये. कारण आम्ही ज्यांनी आपल्याशी नैतिकता जपली त्यांच्याशी प्रतारणा करणारे नाही व आम्हाला वंदनीय बाळासाहेबांची तशी शिकवण नाही. वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीला न आलेल्या काळे यांच्या सोयीचे धोरण घेण्यापेक्षा आधी शिवसेना समजून घ्या मगच बोला असेही श्री.जाधव यांनी फटकारले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत