कोपरगाव शहरात शासकीय वसतिगृह बांधावे - अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरात शासकीय वसतिगृह बांधावे - अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृह नाही त्यामुळे कोपरगाव शहरा...

कोपरगाव/वेबटीम:-



कोपरगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृह नाही त्यामुळे कोपरगाव शहरात सामाजिक न्याय विभागाने शासकिय वसतिगृह उभारावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात पूर्वी माळी बोर्डिंग व शेतकरी बोर्डिंग तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह होते त्यावेळी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसल्याने अनेक गोरगरीब विद्यार्थी या वसतिगृहात शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करत आहेत 

शेतकरी बोर्डिंगची दुरावस्था झाल्यामुळे ती इमारत पडलेली आहे तर माळी बोर्डिंग व आंबेडकर वसतिगृहाची देखील दुरावस्था झाली आहे

कोपरगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत या संस्थेचे खाजगी वसतिगृह आहेत मात्र त्याची वार्षिक फी खूप असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश घेऊन राहणे शक्य होत नाही उलट रोज शिक्षण घेण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागते त्यामुळे शिक्षणापेक्षा प्रवास खर्च जास्त होतो

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह उपलब्ध करून दिले जाते त्यात जेवण व राहण्याच्या सुविधे बरोबरच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते मागासवर्गीय विध्यार्थ्या प्रमाणेच सर्वच जातीच्या हुशार विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे या वसतिगृहात प्रवेश दिला जातो त्याच प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागेअभावी प्रवेश मिळू शकला नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेतून राहण्यासाठी व जेवणासाठी आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे 

कोपरगाव शहरातील पूर्वीच्या शेतकरी बोर्डिंग,माळी बोर्डिंग व डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची अवस्था व सोयी पहाता अनेक विद्यार्थ्यांनी वस्तीगृह  प्रवेश घेणे टाळतात त्याचा सर्वाधिक आर्थिक फटका सर्वसामान्य गोर गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे  तर मुलींना शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणे अवघड होते त्यामुळे अनेक मुलींना अर्ध्यावर शिक्षण सोडून द्यावे लागते

कोपरगाव शहरात इंजिनिअरिंग, मेडिकल,बीएड कॉलेज,एस एसजी एम कॉलेज केजे सोमय्या कॉलेज यांचे वसतिगृह आहेत मात्र इतर अनेक संस्था ची वसतिगृहे नाहीत 

कोपरगाव शहरातील राजकीय नेत्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था व वसतिगृह आहेत मात्र त्यानी कधीही कोपरगाव शहरात गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत शासकीय वसतीगृहाचा लाभ व्हावा म्हणून अद्याप तरी कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसत नाही अधिवासी तालुक्यामध्ये अनेक वसतिगृहाची उभारणी केली आहे त्याच प्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी देखील शासकीय वसतिगृहाची शासनाने उभारणी केली त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना होत आहे कोपरगाव शहरात सामाजिक न्याय विभागाने एक हजार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील असे मुलामुलींचे शासकीय वसतिगृहाची उभारणी करावी अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे या बाबत लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे पोळ यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत